आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओसामा बिन लादेनची कंपनी आर्थिक संकटात; लाखों कामगारांचे भवितव्य धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाद- दहशतवादी संघटना 'अल-कायदा'चा माजी म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या वडिलांची मल्टी नॅशनल कंस्ट्रक्शन कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. सौदी बिन-लादेन ग्रुप (एसबीजी) असे कंपनीचे नाव आहे. सौदी अरबमधील या कंपनीकडे 77 हजार विदेशी कामगारांचा पगार देण्यासाठी रुपये नाही. वर्कर्स ग्रुपने कंपनी विरोधात दंड थोपडले असून रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे, कंपनीच्या निम्म्यापेक्षा जास्त कामगारांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे.

कामगारांचा 4 हजार कोटी रुपये पगार थकवला...
- कंपनीत 77 हजार फॉरेन वर्कर्स व 12 हजार सौदी कामगार काम करतात. मागील काही महिन्यांपासून कंपनीने कामगारांचा पगार केला नाही.
- अल-जजीरा टीव्ही चॅनलनुसार, कंपनीनी कामगारांचा 660 मिलियन डॉलर (4394 कोटी रुपये) पगार थकवला आहे.
- विदेशी कामगारांना कंपनीने फायनल एक्‍झिट व्हिसा दिला आहे.
- दुसरीकडे, 12 हजार सौदी कामगारांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, कंपनीत दोन लाख कामगार कार्यरत...
बातम्या आणखी आहेत...