आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मतारखेचा महिना-आजारांचा संबंध, कोलंबिया विद्यापीठाचे संशोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - जन्मतारीख, महिना व वर्ष याचा मानवी जीवनातील आजार िकंवा त्याला या अनुषंगाने भोगावा लागणारा त्रास याचा काही परस्पर संबंध असू शकतो का, यावर करण्यात आलेल्या संशोधनात जन्मतारखेचा महिना व मानवी आजार याचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना बहुतांश वेळी हृदयाचे विकार होतात. श्वासासंबंधीच्या विकारांचे प्रमाणही अधिक आढळते, असा दावा अमेरिकेतल्या संशोधकांनी केला आहे. जन्म महिना व आजार यांचा ताळेबंद संगणकाच्या आधारे मांडला गेला. जुलै व ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीत दम्याचे प्रमाण जास्त असते. मेमध्ये जन्मलेल्या व्यक्तींत आजारपण कमी असते.