आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Place Of Bhagat Singh In Lahore Of Pakistan

PHOTOS : पाकिस्तानात झाला होता शहीद भगतसिंगांचा जन्म, पाहा त्यांचे पिढीजात घर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगतसिंग यांचे पाकिस्तानातील घर. - Divya Marathi
भगतसिंग यांचे पाकिस्तानातील घर.
शहीद भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी फैसलाबाद जिल्ह्याच्या जरांवाला तहसीलमधील बंगा गावात झाला होता. त्यांचे पूर्वज महाराजा रंजित सिंहांच्या सैन्यात होते. त्यांचे वडील आणि काका गदर पार्टीचे सदस्य होते. ते ब्रिटीशांच्या विरोधात आंदोलन करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच भगतसिंगांच्या मनात ब्रिटीशांच्या विरोधात आक्रोश वाढत होता. 23 मार्च 1931 रोजी शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ब्रिटिशांनी फाशीवर लटकवले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात क्रांतीची लाट पसरली होती. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हसत फाशी स्वीकारली होती.
पाकिस्तानला नाही अभिमान
गेल्यावर्षी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये शहीद भगतसिंग यांच्या नावावर चौकाचे नाव ठेवण्याच्या मुद्याचा चांगलाच विरोध झाला होता. त्यानंतर प्रशासनाने प्रसिद्ध शादमान चौकाचे नाव बदलून भगतसिंग चौक ठेवण्याचा निर्णय टाळला होता. काही महिन्यांपूर्वी फैसलाबाद जिल्ह्याच्या बंगा गावात आठ कोटी रुपये खर्चून भगतसिंगांच्या पिढीजात घराचा जिर्णोद्धार केला जात होता. पण कट्टरपंथीयांनी त्यालाही विरोध केला.
जमात उद दावाने संबोधले हिंदु क्रांतीकारी
एका अधिकाऱ्याने सांगितले की, जमात उद दावाच्या वतीने एक पत्र मिळाले आहे. त्यात चौकाचे नाव हिंदु क्रांतीकाऱ्याच्या नावावरून ठेवू नये असा इशारा देण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार हसन निसार म्हणाले की, भगत सिंग भारत किंवा पाकिस्तानचे असा मुद्दा नाही. जे अशा चर्चा करतात त्यांना लाज वाटायला हवा. उलट स्वातंत्र्याचा एवढा मोठा नायक आमच्या भागतील होता याचा अभिमान असायला हवा, असेही ते म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भगतसिंगांच्या घराचे फोटो...