अमेरिकेच्या बाल्टीमोर शहरातील महापौक स्टीफेनी रॉलिंग्स ब्लेक चर्चमध्ये असताना त्यांना फ्रेडी ग्रेचा मृत्यू झाल्याचे कळले. त्या म्हणतात, मला लगेच लक्षात आले की, हा एका अशांत जुन्या शहरात एका अन्य युवकाचा सामान्य मृत्यू नाही, त्यापेक्षाही अधिक गंभीर घटना आहे. ग्रेच्या मृत्यूच्या नऊ दिवसांनंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले, पोलिसांच्या हातून कृष्णवर्णीयाची हत्या हे अमेरिकेत हळूहळू वाढणारे संकट आहे. कृष्णवर्णीय फ्रेडी ग्रेला १२ एप्रिल रोजी जेव्हा पोलिस ठाण्यामध्ये आणण्यात आले, तेव्हा त्याच्या हातात बेड्या होत्या. तो शुद्धीवर होता. एक तासानंतर तो निपचित पडला. त्याच्या पाठीचा कणा
तुटला होता.
२७ एप्रिलला ग्रेच्या अंत्यविधीनंतर बाल्टीमोरमध्ये दंगे भडकले. शहरात पोलिसांच्या अत्याचाराचे फार जुने काळे मळभ आहे. प्रसिद्ध लेखक एडगर एलन पो यांच्या विरासतसाठी प्रसिद्ध शहरातील २०११ ते २०१४ च्या दरम्यान पोलिसी अत्याचाराचे शिकार असलेल्या १०० पेक्षा अधिक लोकांना नुकसानभरपाईच्या स्वरूपात ३८.२३ कोटी रुपये दिले होते. पीडितांमध्ये तरुणांपासून २६ वर्षीय गरोदर महिला आणि ८७ वर्षीय आजीचा समावेश होता. बाल्टीमोर असे शहर आहे, जेथे १९५०मध्ये लोकसंख्या वाढली. मात्र, नंतर कमी व्हायला लागली. एकेकाळी रिकामी घरे आणि बंद फॅक्टऱ्यांचे दृश्य सर्व कथन करायचे. १९६८मध्ये मार्टिन लूथर किंग यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत ६ जण मारले गेले. एक हजार दुकाने लुटण्यात आली. सिटी काैन्सिलचे प्रेसिडेंट जॅक यंग म्हणतात, आम्ही १९६८ च्या दंग्यांमधून बाहेर येऊ शकलो नाही.
शहराची लोकसंख्या दहा लाखांहून कमी होऊन सहा लाख झाली. गरीब वस्तीत तर साचलेपण आले आहे. बेकारी सरासरीच्या दुप्पट आहे. वर्णभेद आणि आर्थिक असंतोषामुळे बाल्टीमोर अमेरिकेचे मागे पडलेले शहर बनले आहे. अमेरिकेच्या फर्ग्युसन, उत्तर चार्ल्सटन आणि बाल्टीमोरसारख्या भागात हिंसक कृत्ये दशकांपासून अपयशाचे संकेत देतात.
आपण एकसंध देशाप्रमाणे आत्ममंथन करणे गरजेचे असल्याचे ओबामा म्हणतात. हे नवीन नाही. असे अनेक वर्षांपासून होत आहे.
अनेक कृष्णवर्णीय नेत्यांचा उदय आणि पोलिस व अन्य नोकऱ्यांमध्ये कृष्णवर्णीयांच्या वाढत्या संख्येनंतरही बाल्टीमोर अशांत आहे. संपन्न गौरवर्णीय वस्त्यांमध्ये पोलिसांचा व्यवहार कृष्णवर्णीय वस्त्यांच्या तुलनेत चांगला आहे.पोलिस कमिशनर अँथोनी बेट्स म्हणतात, शहरातील गौरवर्णीयांच्या वस्त्या संुदर व संपन्न आहेत. कृष्णवर्णीय व गौरवर्णीयांमध्ये अंतर लक्षात येते. वर्णभेद मुख्य समस्या आहे.