आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे छायाचित्र बनले कृष्णवर्णीयांच्या आंदोलनाचा चेहरा, वाचा का होतेय शेयर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेत सुरू असलेल्या कृष्णवर्णीयांच्या आंदोलनाचे हे दृश्य. हे लुइझियानाच्या बॅटन रुज येथील आहे. सोशल मीडियावर लाखो लोकांनी ते शेअर केले आहे. या छायाचित्रात पेशाने परिचारिका असलेली कृष्णवर्णीय महिला लेशिया इव्हान्स दंगलविरोधी पोलिसांसमोर निर्भयपणे उभी आहे. पोलिसांनी तिला अटक केली. इव्हान्स पाच वर्षांच्या मुलाची आईही आहे. रात्रभर तुरुंगात ठेवल्यानंतर तिला सोडण्यात आले. मिनिसोटात फिलांडो कॅस्टल आणि लुइझियानात एल्टन स्टर्लिंगचा पोलिस गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत ही निदर्शने होत आहेत. पोलिसांनी एका आठवड्यात ३५० पेक्षा जास्त निदर्शकांना अटक केली आहे.
ही सर्व देवाची मर्जी होती : लेशिया
लेशिया म्हणते की, मी जिवंत व सुरक्षित आहे यामुळे खूप आनंदी आहे. माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असावे म्हणून मी येथे आले आहे. मी फक्त एक माध्यम आहे. ही सर्व देवाची मर्जी होती आणि मला खूप प्रसिद्धी मिळाली.
पुढे पाहा, इतरही काही छायाचित्रे..
बातम्या आणखी आहेत...