आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीवर संशय का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोश कॅलर, फोर्ड फेसनडन आणि टीम वॉलेस -उत्तर कोरियाने नुकताच हायड्रोजन बॉम्ब चाचणीचा दावा केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील चाचण्यांची तुलना आणि शास्त्रीय तर्काच्या आधारावर तज्ज्ञांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे. तज्ज्ञ उत्तर कोरियाचा दावा का नाकारत आहेत हे जाणून घेऊया...

कारण स्फोट खूप लहान होता
>६ किलोटनांच्या स्फोटानंतर जी कंपने आणि ऊर्जा तयार झाली ती मागील तीन अणुबॉम्ब चाचण्यांपेक्षा खूप जास्त नव्हती. तिसऱ्या चाचणीपेक्षाही ती कमीच होती.

२००६- १ किलोटन
२००९- २ किलोटन
२०१३- ८ किलोटन

उत्तर कोरियाने बुस्टेड अॅटोमिक बॉम्बची चाचणी केली. शस्त्राची विध्वंसक शक्ती ट्रिटियमने वाढवली असेल. ट्रिटियम हायड्रोजनचा किरणोत्सारी प्रकार आहे. या पद्धतीने आण्विक क्षमता वाढलेली दाखवण्याचा प्रयत्न आहे.

>तज्ज्ञांनुसार असा केला स्फोट
युरेनियम आणि प्लुटोनियम अणूंवर प्रचंड दबाव टाकून त्याच्या गाभ्यात नाभीय विखंडन रोखले तर प्रचंड स्फोट होतो. बुस्टेड अणुबॉम्बही असाच असतो. उत्तर कोरियाने अशीच चाचणी केली असावी. उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीनंतर व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, प्राप्त माहिती उत्तर कोरियाचे दावे खोटे ठरवते.
बातम्या आणखी आहेत...