आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काबुलमधील शिया मशिदीत घुसून सुसाइड बॉम्बरने स्वतःला उडवले, 27 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये सोमवारी आत्मघाती हल्ला झाला. यात 27 लोक मारले गेले असून 35 जखमी आहेत. एका शिया मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्थानिक माध्यमातील वृत्तानुसार, राजधानीच्या दारुल अमन भागात हल्ला झाला. बाकिर-उल-उलूम मशिदीच्या आत घुसून एका सुसाइड बॉम्बरने स्वतःला उडवून दिले.
मृतांमध्ये मुलांचाही समावेश
- काबुल पोलिस सीआयडी प्रमुख फरीदन ओबैदी यांनी 27 लोक ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- तालिबानने या स्फोटात हात असल्याचे नाकारले आहे.
- तालिबानचा प्रवक्ता, जबिहुल्लाह मुजाहिद याने म्हटले, या स्फोटासी आमचा काहीही संबंध नाही.
लोक नमाज पठण करत असताना हल्ला
- अली जान नामक एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, लोक नमाज पठण करत होते, तेव्हाच मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. आवाजामुळे खिडकीच्या काचा फुटल्या. मी ओरडतच बाहेर पळालो.
बातम्या आणखी आहेत...