आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Afghanistan Capital Kabul Near Foreign Embassies

काबूलमध्ये स्फोट, भारतीय दुतावासापासून अवघे 2.5 किमी अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी अशलेल्या काबूलमध्ये शुक्रवारी सायंकाळी स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ज्याठिकाणी स्फोट झाला त्याठिकाणी अनेक देशांच्या दुतावासांच्या इमारती आणि सरकारी कार्यालये आहेत. भारतीय दुतावासापासून अवघ्या 2.5 किमी अंतरावर हा स्फोट झाला आहे.

UPDATES
- अफगाणिस्तानच्या मीडियानुसार हा स्फोट 9th स्ट्रीट परिसरात झाला.
- एका गेस्ट हाऊसला लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला.

चार दिवसांपूर्वी झाला होता स्फोट
- चार दिवसांपूर्वीच काबूल एअरपोर्टच्या गेटवर तालिबानच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवला होता.
- या स्फोटात विदेशी सैनिक टार्गेटवर होते.
- समोर आलेल्या या माहितीनुसार एअरपोर्टच्या या गेटचा वापर नाटो आणि अमेरिकेचे सैनिक अधिक प्रमाणात करत होते.