आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीच्‍या हल्‍ल्यात 10 जण ठार, फ्रांस-जर्मनीच्‍या पर्यटकांना लक्ष्य करून स्‍फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल - तुर्कीच्‍या सुल्‍तान अहमत चौकात मंगळवारी जोरदार बॉम्‍बस्‍फोट झाला. या स्‍फोटात 10 लोक ठार झाल्‍याची माहिती आहे. तर, 15 जण जखमी झाले आहेत. हल्‍ला झाला त्‍या चौकात विदेशी पर्यटकांची संख्‍या अधिक होती. दोगन वृत्‍तसंस्‍थेच्‍या माहितीनुसार या स्‍फोटात जर्मन आणि फ्रांसच्‍या पर्यटकांना निशाणा बनवण्‍यात आले होते.
स्‍फोटाच्‍या मागे एका महिलेचा हात...
- वृत्‍तसंस्‍था एएफपीने तुर्की अधिका-यांच्‍या माहितीनुसार हा दहशतवादी हल्‍ला असल्‍याचे सांगितले.
- स्‍थानिक माध्‍यमांच्‍या माहितीनुसार या हल्‍ल्‍्यामागे एका महिलेचा हात आहे.
- पोलिसांची टीम आणि रूग्‍णवाहिका घटनास्‍थळावर उभी आहे. पोलिस या हल्‍ल्‍्याचा तपास करत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, स्‍फोटोचे फोटो....