आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की : इस्तंबूलमधील शॉपिंग स्ट्रिटवर सुसाइड ब्लास्ट, चार ठार; 20 हून अधिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - तुर्कीमध्ये इस्तंबूलमधील एका वर्दळीच्या ठिकाणी आत्मघाती हल्ला झाला आहे. ताकिज्म स्क्वेअरच्या जवळ इस्तिकल स्ट्रिटवर झालेल्या स्फोटात चार जण मारले गेले आणि 20 हून अधिक जखमी झाले आहेत. तातडीच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्स आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

लोक शॉपिंग करत असतान स्फोट
- स्फोटा दरम्यान मार्केटमध्ये अधिकांश लोक दुकांनांमध्ये शॉपिंग करत होते.
- स्फोटानंतर शेकडो लोक जीव मुठीत घेऊन सुरक्षीत जागा शोधत धावत होते, यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
- ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे अनेक दुकाने असून टुरिस्ट येथे शॉपिंगसाठी येतात.

जुलैपासून आतापर्यंत पाच स्फोट
- जुलैपासून आतापर्यंत तुर्कीमध्ये पाच मोठे स्फोट झाले आहेत. सोमवारी कुर्दीश नववर्षाच्या पार्श्वभूमीवर येथे हायअलर्ट घोषित करण्यात आला होता.
- सहा दिवसांपूर्वी राजधानी अंकारामध्ये आत्मघाती कारबॉम्ब स्फोट झाला होता. त्यात 35 लोक मारले गेले होते. कुर्दिश बंडखोरांनी याची जबाबदारी घेतली होती.
- गेल्या काही महिन्यात आयएसआयएसने देखिल तुर्कीला अनेकदा लक्ष्य केले आहे.
बातम्या आणखी आहेत...