आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल : रशियन दुतावासासमोर आत्मघातकी हल्ला, 4 ठार, 24 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन दुतावासासमोर याच बसला लक्ष्य करण्यात आले. - Divya Marathi
रशियन दुतावासासमोर याच बसला लक्ष्य करण्यात आले.
काबूल (अफगाणिस्तान) - राजधानी काबूलमध्ये रशियाच्या दुतावासासमोर आत्मघातली हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये सुमारे 4 जण झार झाल्याची माहिती आहे. 24 जखमी असून अनेक गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हल्ला झाला त्याठिकाणापासून जवळच संसदेची इमारतही आहे.

UPDATES
- टोलो न्यूजच्या वृत्तानुसार दुतावासाजवळ एका बसला लक्ष्य करून हा हल्ला घडवण्यात आला.
- पझवोक अफगान न्यूजच्या सुत्रांनी चार जण ठार झाल्याची माहिती दिली आहे. मात्र 24 जण जखणी असून त्यापैकी अनेक गंभीर आहेत.
- प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दुतावासासमोर एका कारमध्ये बॉम्बस्फोट झाला.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार फायर फायटर्सची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
- स्फोटामुळे दुतावासासमोरील एका इमारतीत आग लागली असल्याचे सांगण्यात आले आहे.
आठवडाभरापूर्वीही झाला होता हल्ला
- 13 जानेवारीला जलालाबादमध्ये आत्मघातकी हल्ला घडवत पाकिस्तानच्या दुतावासाला लक्ष्य करण्यात आले होते.
- त्यापैकी दोन पोलिसांसह अफगाणिस्तानच्या 7 जवानांचा मृत्यू झाला होता.
- या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली होती.

3 जानेवारीलाही झाला होता हल्ला
- त्यापूर्वी 3 जानेवारीला भारतीय दुतावासावरही दहशतवादी हल्ला झाला होता.
- 4 दहशतवाद्यांनी मृत्यूपूर्वी भिंतींवर रक्ताने घोषणा लिहिल्या होत्या.
- त्यातील एका मॅसेजमध्ये अफजल गुरूचा बदला असे लिहिलेले होते.
- 25 तासांच्या एन्काउंटरनंतर सर्व आरोपींना कंठस्नान घालण्यात यश आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO