आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काबूलमध्ये मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूलमध्ये मशिदीत आत्मघातकी बॉम्बस्फोट
वृत्तसंस्था । काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील शियांच्या मशिदीत सोमवारी झालेल्या शक्तिशाली आत्मघातकी बॉम्बस्फोटात ३२ जण ठार, तर ४८ जण जखमी झाले. एका धार्मिक कार्यक्रमासाठी लोक मोठ्या प्रमाणात मशिदीत जमले होते.

वरिष्ठ पोलिस अधिकारी फिरदौन ओबैदी यांनी सांगितले की, काबूलच्या पश्चिम भागातील बकिरूल ओलुम मशिदीत ही घटना घडली. आत्मघाती बॉम्बर मशिदीत भाविकांमध्येच बसला होता. त्याने बॉम्बस्फोट घडवून स्वत:ला उडवून घेतले. त्यात ३२ जण ठार, तर ४८ जण जखमी झाले. पोलिसांनी या मशिदीची घेराबंदी केली आहे. ‘मी मशिदीत होतो. लोक प्रार्थना करत होते. अचानक मोठा आवाज ऐकू आला आणि खिडक्या तुटल्या. काय घडले याची कल्पना नाही. मी धावतच बाहेर पडलो’, असे अली जान या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. आशुरा या मोठ्या सणानंतर ४० दिवसांनी अरबीन हा शियांचा समारंभ होतो. त्यासाठी भाविक मशिदीत जमले होते. या आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही दहशतवादी गटाने स्वीकारली नव्हती. या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर अफगाणिस्तानमध्ये आशुरादरम्यान झालेल्या शक्तिशाली स्फोटात १४ जण ठार झाले होते. त्या वेळीही शियांनाच लक्ष्य करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटने काबूल येथे दोन हल्ल्यांत १८ शिया नागरिकांची हत्या केली होती.
बातम्या आणखी आहेत...