आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशात हिंसाचार सुरूच; बाॅम्बस्फोटामध्ये ४ जण ठार, ईदच्या उत्सवावर शोककळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - ढाक्यातील कॅफेवरील दहशतवादी हल्ल्याच्या बातमीची शाई वाळलीही नाही तोच बांगलादेशची राजधानी ढाका गुरुवारी बाॅम्बस्फोट, गोळीबाराने हादरली. स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांत दोन पोलिसांचा समावेश आहे. चकमकीत एका दहशतवाद्याचाही खात्मा झाला. देशातील सर्वात मोठ्या ईदच्या नमाजासाठी एकत्र आलेल्या लोकांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न करण्यात आला.
राजधानीतील उत्तरेकडील किशोरगंज जिल्ह्यातील शोलाकियामध्ये ईदच्या प्रार्थनेसाठी सुमारे २ लाख भाविक एकत्र आले होते. त्याच वेळी हल्लेखोरांनी परिसरात अंदाधुंद गोळीबार व स्फोट केला. पोलिस व हल्लेखोर यांच्यात धुमश्चक्री सुरू झाली. गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला आपल्या घराच्या खिडकीतून चकमक पाहत असताना तिला गोळी लागली. गोळीबार सुरू असतानाच एक संशयित हल्लेखोरही ठार झाला. एकास पकडण्यात पोलिस दलास यश मिळाले आहे. घटनेत १३ जण जखमी झाले आहेत. सहा ते सात हल्लेखोरांनी हा हल्ला घडवला असावा, असा अंदाज आहे. त्यांनी प्रार्थनेच्या निमित्ताने पोलिसांवर हल्लाबोल केला. स्फोटासाठी गावठी बाॅम्बचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात ढाक्यातील कॅफेवर झालेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात १९ वर्षीय भारतीय मुलीचाही समावेश आहे. दुसरीकडे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने बुधवारी एक व्हिडिआे जारी करून बांगलादेश सरकारला आणखी हल्ले करणार असल्याचा इशारा दिला. शरिया कायद्याची अंमलबजावणी न केल्यास अशा प्रकारचे हल्ले होतच राहतील, अशी धमकीही इसिसने दिली आहे. त्यामुळे सणासुदीच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

घाबरून जाऊ नका : शेख हसीना
हल्ला करणारे इस्लाम व मानवतेचे शत्रू आहेत. समाजात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे,असे त्यांना वाटते. म्हणून लोकांनी मुळीच घाबरून जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान शेख हसीना यांनी केले.

दोघांच्या मुसक्या आवळल्या
हल्ल्यानंतर पोलिसांनी राजधानी ढाक्यात धाडसत्र राबवले. दोन संशयित हल्लेखाेरांना ताब्यात घेण्यात आले आहे. ईदच्या दिवशी हा हल्ला झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्थेतही आणखी वाढ करण्यात आली.

ईदच्या दिवशी तोयबाची हेरांना धमकी
ईदच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने हेरगिरी करणाऱ्यांना गोळीने उडवून देण्याची धमकी दिली. तोयबाच्या हालचालींची माहिती घेऊन भारतीय सुरक्षा दल त्यांचा डाव उधळून लावत असल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे तोयबा संघटनेने हेरगिरी करणाऱ्यांना गोळी घालून ठार करू, असा इशारा दिला आहे.

एनएसजीची टीम बांगलादेशला जाणार
नवी दिल्ली | राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) एक पथक शुक्रवारी बांगलादेशला जाणार आहे. शेजारच्या देशातील दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी टीम रवाना होणार आहे. हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी कोणत्या स्फोटकांचा वापर केला होता, त्यासाठी कशा प्रकारची रणनीती आखण्यात आली होती, याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी ही टीम जाणार आहे. दोन्ही हल्ल्यांचा तपशील सुरक्षेच्या पातळीवर समजून घेतला जाणार आहे. अगोदरही एनएसजीचे पथक काही देशांतील हल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी गेले होते.
ISIS ने बुधवारी दिली होती हल्ल्याची धमकी...
- ISIS ने बुधवारी देशात आणखी अतिरेकी हल्ल्याची धमकी दिली होती.
- ISIS च्या न्यूज एजन्सीने रक्का येथून नवा व्हिडिओ जारी करून बांगलादेश सरकारला काफिर संबोधित केले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी बांगलादेशची राजधानी ढाक्यात एका रेस्तराँमध्ये ISIS ने अतिरेकी हल्ला केला होता. यात भारतीय तरुणी तारिषी जैन हिच्यासह 20 जणांचा मृत्यू झाला होता. लष्कराने 6 अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, ढाक्यात एका रेस्तराँमध्ये ISIS ने केला होता अतिरेकी हल्ला

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...