आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये स्पेनच्या दुतावासाजवळ स्फोट, चार दिवसांत तिसरा हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्ल्यात एक जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. - Divya Marathi
हल्ल्यात एक जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी सायंकाळी स्पेनच्या दुतावासासमोर स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा स्फोट काबूल सिटीच्या शिरपूर परिसरात एका कारमध्ये झाला. अफगाणिस्तान तालिबानने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. हल्लेखोर आणि सेक्युरिटी फोर्सेस यांच्यात यावेळी फायरिंगही झाली. यात एक जण ठार झाल्याची माहिती आहे. दहापेक्षा अधिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. चार दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे.

UPDATES
-अफगान तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत म्हटले आहे की, आम्ही कार बॉम्बने उडवली होती. आमचे सात सदस्य अजूनही अफगाण पोलिसांवर गोळीबार करत आहेत.
- सेंट्रल काबूलमध्ये स्पेनच्या दुतावासाबाहेर गेस्टहाऊसला लक्ष्य करून एका कारमध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला. काही वेळानंतर त्याठिकाणी रॉकेट हल्ल्याची माहिती मिळाली. अफगाणिस्तान मीडियानेही याला दुजोरा दिला.
- काबूलच्या या परिसरात जेव्हा हल्ला झाला, त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान याठिकाणी फायरिंगही झाली.
- नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
- हल्ला झालेल्या शिरपूरमध्ये अनेक NGO'S ची कार्यालये आणि सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.

दोन दिवसांपूर्वी कंधहार विमानतळाला केले होते लक्ष्य
- अफगाणिस्तानात दोन दिवसांपूर्वी कंधहार एअरपोर्टला हल्लेखोरांनी लक्ष्य केले होते. त्यादरम्यान सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 10 दहशतवादी ठार झाले होते.
- मंगळवारी हल्ल्यात दहशतवाद्यांनी जवळच असलेल्या एखा शाळेच्या इमारतीवर ताबा घेतला होता.

काबूरमध्ये रोज अपयशी होतात 10 हल्ले
- अफणिस्तानातील नाटोचे जनरल जॉन कँबेल यांनी काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, काबूलमध्ये अशी स्थिती झाली आहे की, दररोज 10 दहशतवादी हल्ले परतवले जातात. दहशतवादी आता हाय प्रोफाइल हल्ले करत आहेत.
- अफगाणिस्तानच्या डिफन्स मिनिस्ट्रीच्या मते संपूर्ण देशात दहशतवादी हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या मृत्यूचे प्रमाण 75 टक्क्यांनी वाढले आहे.
- 2014 मध्ये 4634 अफगाण जवान हल्ल्यांमध्ये शहीद झाले होते.

अफगाणिस्तानात भारतीय किती सुरक्षित
- काबूलमध्ये याच वर्षी 13 मे रोजी कोलोला पुश्ता परिसरातील गेस्ट हाउस पार्क पॅलेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 4 भारतीयांसह 14 जणांचा मृत्यू झाला होता.
- येथे अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत अमर सिन्हा जाणार होते. त्यामुळे गेस्ट हाऊसला लक्ष्य करण्यात आले होते.
- फेब्रुवारीमध्ये हेलमंद प्रांतात तालिबानने फादर अलेक्सिस प्रेमकुमार अँटनीसामी यांचे अपहरण केले होते. पण भारतीय गुप्तचर संस्थांच्या अभियानानंतर फादर यांना सोडवण्यात यश आले.
- 2014 मध्ये अफगाणिस्तानात भारतीयांच्या विरोधात 14 दहशतवादी घटना घडल्या होत्या.
- 2013 मध्ये जलालाबादमधील भारतीय दुतावासावर हल्ल्यासह ३ दहशतवादी घटना घडल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ आणि PHOTOS