आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast Killed At Least 60 In Baghdad\'s Wholesale Market

इराक : ट्रकमध्ये स्फोट, 60 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा अधिक जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर बाजारातील वाहनांची अशी अवस्था झाली होती. - Divya Marathi
स्फोटानंतर बाजारातील वाहनांची अशी अवस्था झाली होती.
बगदाद - इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये स्फोटकांनी भरलेल्या एका ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात सुमारे 60 जण ठार झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राजधानीत झालेला हा सर्वात मोठा ब्लास्ट आहे. हा ब्लास्ट झालेली जागा बगदादमधील सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजधानीच्या उत्तर-पूर्व शिया जिल्ह्यात सद्र मध्ये हा स्फोट झाला. त्यात 200 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या स्फोटात ISIS चा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस विभागाचे अधिकारी मुशीन अल-साइदी यांनी सांगितले की, सकाळी 6 च्या सुमारास स्फोटकांनी भरलेला एक रेफ्रिजरेटेड ट्रक जमिला मार्केटमध्ये घुसला आणि त्याचा स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट एवढा मोठा होता ही मृतदेहाचे तुकडे उडून आजूबाजूच्या इमारतींच्या वरपर्यंत पोहोचले होते.