आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदी अरेबियामध्‍ये शिया मशिदीजवळ बॉम्बस्फोट, पाच जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - सौदी अरेबियाच्या पूर्व भागात शिया मशिदीच्या बाहेर बॉम्ब स्फोटात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. यात हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. स्थान‍िक पोलिस अधिका-यांच्या माहितीनुसार, दम्माम शहराच्या अल-अनौदमध्‍ये इमाम हुसेन शिया मशिदी बाहेर कारमध्‍ये स्फोटा झाला. दहशतवादी संघटना आयएसआयएसने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
हल्लेखोर मुख्‍य प्रवेश द्वाराच्या आत येत होता
सुरक्षा कर्मचा-याने सांगितले, की मशिदीच्या बाहेर एक संदिग्ध कार दिसत होती. मात्र त्याबाबात कारवाई करण्‍यापूर्वीच कारमध्‍ये जबरदस्त स्फोट झाला. हल्लेखोराबरोबरच कार जवळ असलेल्या चार लोकांचा मृत्यू झाला. स्फोटामुळे अनेक गाड्यांना आग लागली होती. अहमद नावाच्या एका साक्षीदाराच्या माहितीनुसार, जेव्हा हल्लेखोर मुख्‍य प्रवेश दरवाजातून आत घूसण्‍याचा प्रयत्न करित होता, तेव्हाच स्फोट झाला.
मागील शुक्रवारीही स्फोटाची घटना
मागील आठवड्यातही शुक्रवारी अजानच्या दरम्यान कातिफ प्रांतात अल-कदीह गावाचे शिया मशिदीत स्फोट झाला होता. यात 21 लोक मारली गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएसनेही घेतली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, स्फोटाशी संबंधित फोटोज...