आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्ये आणखी एका ब्लॉगरची गळा कापून हत्या, ब्लॉगर्सच्या हत्येचे चौथे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशमधील धर्मनिरपेक्ष ब्लॉगरच्या हत्येचे सत्र थांबलेले नाही. निलय नील नावाच्या ४० वर्षीय ब्लॉगरची त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये गळा कापून हत्या करण्यात आली. निलयचा फ्लॅट ढाक्याच्या उत्तरेकडील गोरहान भागातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. त्यांचे मृतदेह फ्लॅटमधून ताब्यात घेण्यात आला.

देशात ब्लॉगर्सच्या हत्येचे हे चौथे प्रकरण आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास ही हत्या झाली. नमाजनंतर पाच लोक त्यांच्या फ्लॅटमध्ये दाखल झाले. त्यांनीच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. नील या फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. १९७१ च्या स्वातंत्र्य लढ्यात युद्ध गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी नील यांनी आपल्या ब्लॉगद्वारे लावून धरली होती. त्याचे प्रवक्ता इम्रान एच. सरकार म्हणाले, हल्लेखोरांनी स्वत:ची आेळख संभाव्य भाडेकरू म्हणून केली होती. त्यामुळे त्यांना इमारतीमध्ये प्रवेश मिळाला होता.

अगोदर तीन हत्या
याच वर्षी फेब्रुवारीमध्ये ४५ वर्षीय ब्लॉगर अविजित रॉय यांची निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर ब्लॉगर वशीकुर रहमान यांची हत्या झाली होती. दोन वर्षांपूर्वी ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांची मीरपूर येथील घरात हत्या झाली होती. अल-कायदाशी संबंधित इंडियन सबकॉन्टिनंट या संघटनेने धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्सच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. कट्टरवादी अन्सार बांग्ला गटानेही जबाबदारी घेतली होती.
बातम्या आणखी आहेत...