यू ट्यूबवर आपण अनेक प्रँक व्हिडीओ पाहतो. काही व्हिडीओ तर एवढे धोकादायक असतात की, पाहणाऱ्यांचा श्वास रोखला जातो. नुकताच यु ट्यूब प्रँकस्टर रोमन एटवून यांनी असाच एख प्रँक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, पण त्याबरोबरच त्यावर चांगलीच टीकादेखिल होत आहे. एखाद्या आईचा तीन वर्षांचा मुलगा तिच्यासमोरच अपघातात मृत्यू पावला तर त्याची प्रतिक्रिया कशी असेल असा विचार रोमनच्या मनात आला. याच कल्पनेतून त्याने गर्लफ्रेंड ब्रिटनी स्मिथ आणि तिची तीन वर्षांचा मुलगा केनबरोबर ए प्रँक व्हिडीओ तयार केला. 11 ऑक्टोबरला पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 1.2 कोटी लोकांनी पाहिला आहे.
व्हिडीओमध्ये काय...
> प्रँकस्टर रोमन गर्लफ्रेंडच्या मुलाबरोबर बाईक चालवत आहे. ही बाईक रिमोटद्वारेही चालते. त्याबाबत तिच्या गर्लफ्रेंडला माहिती नाही.
> जेव्हा रोमनची गर्लफ्रेंड ब्रिटनी तेथे येते तेव्हा तो तिला सांगतो की तिच्या मुलाला बाईक विकत घ्यायची आहे. ब्रिटनी आनंदाने चेकबूक आणायला जाते. त्यावेळी रोमन त्याजागी त्याचा डमी बसवतो. मुलालाही आईला फसवण्यासाठी तो राजी करतो.
> आईला येताना पाहून मुलगा कोपऱ्यात लपून बसतो. आणि रिमोटने बाईक चालवतो. बाइक वेगाने धावू लागते.
> रोमनही बाईकचे नियंत्रण सुटल्यासारखे दाखवून त्यामागे धावतो. पण बाईक अत्यंत जोरात उडते आणि बागेत जाऊन पडते. त्यानंतर एक मोठा स्फोट होतो.
> हे सर्व पाहून त्या त्या मुलाची आई ब्रिटनी सुन्न होते.
या सर्व प्रकाराचे PHOTOS पाहा पुढील स्लाइड्सवर...
मुलाच्या आईची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्या VIDEO द्वारे (अखेरच्या स्लाइडवर)