आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात शानदार प्रायवेट प्लेन, तयार करण्यासाठी खर्च झाले 2000 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - 2000 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले बोईंग 787 - 2 डीअर हे सर्व सुविधांच्या बाबतीत एकदम सरस ठरत आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेले प्लेन प्रायवेट जेटमध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वोत्तम बेडरुम्स, आलिशान डायनिंग रुम, मोठा ऑफिस एरिया, सिनेमा आणि पेंटहाऊससारख्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. साधारणतङ बोईंग प्लेनमध्ये अडीचशे ते 300 प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र या प्रायवेट प्लेनमध्ये 40 प्रवासी प्रवास करू शकतील. 

 

एका तासाचे भाडे 49 लाख रुपये...

- फ्लाईंग पेंटहाऊस नावाने तयार करण्यात आलेल्या जेटमध्ये मास्टर बेडरुम, गेस्ट रुम, लिव्हिंग रुम आणि इंटरटेनमेंट सुट देण्यात आला आहे.
- याव्यतरिक्त सर्व प्रकारच्या अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेटमध्ये प्रवाशांना टॅबलेट उपलब्ध करून दिला आहे.याद्वारे तुम्हाला टीव्ही आणि लायटिंग ऑपरेट करू शकता.
- प्लेनच्या मागील बाजूस बिझनेस क्लाससह 18 फुट सीट देण्यात आलेली आहे. त्याशिवाय क्रु मेंबर्ससाठी रेस्ट स्पेस ठेवण्यात आला आहे.
- हे विमान तयार करण्यासाठी 2159 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 
- यामध्ये असलेल्या एअर टेक्नॉलॉजीमुळे किटाणूंचा नायनाट करण्यास मदत होईल.
- या विमानाने सलग 17 तास 10 हजार मैलाचा प्रवास करता येईल.

 

पुढील स्लाईडवर पाहा - या प्रायवेट प्लेनेच इनसाईड फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...