आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Blamed For Nigeria Explosion That Killed 32 And Injured 80

नायजेरियाच्‍या फळ बाजारात बॉम्‍बस्‍फोट, 32 ठार तर 80 गंभीर जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळावर पोहोचलेली सुरक्षा यंत्रणा - Divya Marathi
घटनास्‍थळावर पोहोचलेली सुरक्षा यंत्रणा
योला (नायजेरिया) - उत्तर-पूर्व नायजेरियातील अदामावा राज्याची राजधानी योला येथील एका फळ बाजारात बॉम्‍ब स्‍फोट झाला. यात 32 नागरिक ठार तर 80 जखमी झालेत. ही घटना स्‍थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 8 वाजता घडली. घटनास्‍थळावर सुरक्षा यंत्रणा पोहोचली असून, मदत कार्य सुरू आहे.
'बोको हरम'वर संशय
हा स्‍फोट दहशतवादी संघटना बोको हरमने घडवून आणला, असा संशय नायजेरियाची रेड क्रॉस आणि नॅशनल इमरजेंसी मॅनेजमेंट एजेंसी (NEMA) संस्‍थेने व्‍यक्‍त केला. पण, या हल्‍ल्‍याची कुणीच जबाबदारी घेतली नाही. नजेरियाच्‍या उत्‍तर-पूर्व राज्‍यात इस्लामिक शरिया कायदा लागू व्‍हावा, यासाठी 'बोको हरम' सातत्‍याने दहशतवादी कारवाया करत आहे. त्‍यांनी मागील सहा महिन्‍यात शेकडो नागरिकांचा बळी घेतला.
यापूर्वीसुद्धा घडवले स्‍फोट
नेमाचे प्रादेशिक प्रवक्ते अल हाजी सा अद बेलो यांनी सांगितले की, बोको हरमने काही आठवड्यापूर्वी चॅड, नायजर आणि कॅमरून शहररांत आत्मघाती हल्‍ले केले. यापूर्वी ऑक्‍टोबरमध्‍ये योला आणि मॅदुगुरीमध्‍येही हल्‍ला केला. यात 37 लोकांचा मृत्‍यू झाला होता.
बाजारपेठ, बसस्‍थानकावर हल्‍ले
बोको हरम या दहशतवादी संघटनेला संपवून टाकू, असे व्‍यक्‍तव्‍य नायजेरियाचचे राष्ट्रपती मोहम्मद बुखारी यांनी केले होते. त्‍यानंतर बोको हरमने आपल्‍या कारवाया वाढवून 1000 पेक्षा अधिक व्‍यक्‍तींची हत्‍या केली. दरम्‍यान, नायजेरियाचे सैन्‍य दल सातत्‍याने बोको हरमच्‍या ताब्‍यात असलेल्‍या प्रदेशावर हल्‍ले करत असून, त्‍याला प्रत्‍युतर म्‍हणून बोको हरमकडून बाजारपेठ, बस स्‍थानक, इबादतगाह अशा वर्दळीच्‍या ठिकाणावर हल्‍ले चढवले जात आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...