आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Kidnapped 2 Thousand Women's : Report

बोको हरामने केले 2 हजार मुली आणि महिलांचे अपहरण, अहवालातील माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लागोस - बोकोहराम या कट्टरवादी संघटनेने किमान २००० महिला व मुलींचे अपहरण केल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालात म्हटले आहे. २०१४ च्या सुरुवातीपासून या अपहरण सत्राला सुरुवात झाली. नायजेरियातील एका शाळेतून २१९ मुलींचे अपहरण या संघटनेने केले होते.
चिबॉक या ईशान्य प्रांतातूनही अनेक किशोरवयीनांना बोकोहरामने ताब्यात घेतले होते. अॅम्नेस्टीने नायजेरियातील विविध प्रांतवार अपहृतांची यादी या अहवालात दिली आहे. दरम्यान, बोकोहरामचा नेता अबुबकर शेकू याने सर्व अपहृत किशोरवयीनांनी इस्लाम कबूल केल्याचे म्हटले आहे. अपहरण केलेल्या मुली कुराण पठण करतानाचे व्हिडिआेदेखील संघटनेने व्हायरल केले होते. या महिला व मुलींकडून घरगुती कामे करवून घेतली जातात व त्यांचे जिहादींशी निकाह लावले जात असल्याचे दिसून आले. मानवाधिकार संरक्षण कार्यकर्त्यांनी सुटलेल्या मुलींच्या मुलाखती घेतल्या.