आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवाद्यांच्या बदल्यात २१ मुलींची सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लागोस - बोको हरमच्या तावडीतून २१ मुलींची सुटका झाली आहे. कट्टरवादी संघटनेने आपल्या काही साथीदारांना तुरुंगातून सोडण्याच्या बदल्यात या शालेय मुलींची सुटका केली आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बोको हरम व सरकार यांच्यात कैदी बदलाचा करार झाला होता. त्यानुसार बोको हरमने अनेक महिने आेलिस ठेवलेल्या मुलींची मुक्तता केली. मुलींची सुटका झाल्याच्या वृत्ताला स्विस सरकारकडूनही दुजोरा मिळाला आहे. कट्टरवादी संघटना व नायजेरियन सरकार यांच्यातील वाटाघाटीमध्ये स्विस सरकारने मध्यस्थी केली होती. सध्या या मुली सरकारच्या गृह खात्याकडे आहेत, अशी माहिती राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते गारबा शेहू यांनी यांनी गुरुवारी दिली. वाटाघाटीत आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेचीही भूमिका राहिली आहे.
२०१४ मध्ये अपहरण
नायजेरियाच्या ईशान्येकडील चिबॉक शहरातून शाळकरी मुलींचे अपहरण झाले होते. बोको हरमने एप्रिल २०१४ मध्ये २०० मुलींना उचलून नेले होते. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती.
इसिसची सत्ता : बोको हरम ही दहशतवादी संघटना सक्रिय झाल्यानंतर त्यांनी जगाचे लक्ष वेधण्यासाठी मुलींचे अपहरण केले होते. इस्लामिक स्टेटची सत्ता स्थापन करण्याचा त्याचा उद्देश आहे. गेल्या सात वर्षांपासून संघटनेचा हिंसाचार सुरू आहे. त्यात किमान २० हजार प्राण गेले. दहशतवादाची झळ सीमेवरील नायजर, चाड, कॅमरूनला बसली.
महिला आत्मघाती हल्ल्यात ८ ठार : नायजेरियाच्या ईशान्येकडील भाग अशांत असून गुरुवारी एका नागरी वसाहतीजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान ८ जण ठार झाले. महिला हल्लेखोराने हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. काही नागरिकांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बातम्या आणखी आहेत...