आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram On ISIS Line, Releases First Beheading Video

ISIS च्या पावलावर बोको हरमचे पाऊल, जाहीर केला शिर कापण्याचा व्हिडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- बोको हरमचा पहिला प्रोपोगांडा व्हिडिओ.)
आबुजा (नायजेरीया)- येथील दहशतवादी संघटना बोलो हरमने पहिल्यांदाच ISIS च्या स्टाईलमध्ये शिर कापण्याचा प्रोपोगांडा व्हिडिओ जाहीर केला आहे. या व्हिडिओत बोलो हरमचे दहशतवादी आफ्रिकी युनियनच्या जवानांचे शिर कापताना दिसून येतात. इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने यापूर्वी अनेक अशा स्वरुपाचे व्हिडिओ जाहीर करुन दहशत माजवली आहे. विशेष म्हणजे बोलो हरमने जाहीर केलेल्या व्हिडिओवर इस्लामिक स्टेटचा हॉलमार्क दिसतो. इस्लामिक स्टेटने आफ्रिकेतील दहशतवादी संघटना बोलो हरमशी नुकतीच भागिदारी केली आहे. पश्चिम आफ्रिकेत मीडिया विंग स्थापन करण्याचा बोको हरमचा प्रयत्न आहे. त्यासाठी इस्लामिक स्टेट मदत करीत आहे.
काय आहे व्हिडिओत
10 मिनिटांच्या या व्हिडिओत बोको हरमचे दहशतवादी नायजेरीयाच्या जवानांसोबत लढताना दिसतात. दहशतवादी मोर्टार, ग्रेनेड आणि रॉकेट लॉंचर्स या सारख्या अवजड शस्त्रांचा उपयोग करताना दिसून येतात. यावेळी जवान ठार मारले की त्यांचे मृतदेह किंवा बॅचेस घेऊन दहशतवादी कॅमेऱ्यासमोर येतात. या व्हिडिओच्या अखेर आफ्रिकी युनियनचा एक जवान घुडघ्यांवर बसलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. त्याच्या मागे हातात एके-47 आणि चेहऱ्यावर मास्क असलेले दहशतवादी उभे आहेत. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी जमिनीवर शिर कापलेला त्याचा व्हिडिओ दिसतो. गेल्या वर्षी बोको हरम या दहशतवादी संघटनेने नायजेरीयात तब्बल 10 लाख लोक ठार मारले.
पुढील स्लाईडवर बघा, बोको हरमने जाहीर केलेल्या व्हिडिओचे फोटो....