आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boko Haram Slaughter 150 Nigerian Muslims Praying In Mosques

बोको हरामचा नमाज पठण करणार्‍या 150 मुस्लिमांंवर गोळीबार, मृतदेह जाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - बोर्नो राज्यात याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारलेले लोक - Divya Marathi
फाइल फोटो - बोर्नो राज्यात याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मारलेले लोक
मैदुगुरी (नायजेरिया) - दहशतवादी संघटना बोको हरामने गुरुवारी 150 मुस्लिमांची रोजा सोडण्याआधी सुरु असलेल्या नमाजावेळी हत्या करुन त्यांचे मृतदेह पेटवून दिले. दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांनाही सोडले नाही. लोकांची हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी घरे पेटवून दिली. नायजेरियामध्ये पाच आठवड्यापूर्वी बुहारी सत्तेत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जाते आहे. काही महिन्यांपूर्वी बोको हरामने आयएसआयएससोबत हात मिळवणी केल्याचेही समोर आले होते.

दहशतवाद्यांनी 150 मुस्लिमांची हत्या करण्याची घटना नायझेरियाच्या उत्तर पूर्व बोर्नो जिल्ह्यातील कुकावा गावात घडली आहे. या हत्याकांडातून स्वतःचा जीव वाचवून पळ काढलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की 50 शस्त्रसज्ज दहशतवादी गावात घुसले होते. त्यांच्याकडे व्हॅन आणि मोटरसायकली होत्या. गावात आल्याबरोबर त्यांनी मशिदीत प्रवेश केला. तिथे नमाज सुरु असताना पुरुष आणि मुलांवर बेछूट गोळीबार सुरु केला. त्यानंतर त्यातून कोणी वाचले का याची काहीवेळ तिथेच उभे राहून वाट पाहिली आणि नंतर मृतदेहांना पेटवून दिले. त्यानंतर दहशतवादी गावात घुसले आणि घरांमध्ये स्वंयपाक करत असलेल्या महिलांवर गोळीबार केला. तेथून त्यांनी दुसऱ्या गावाकडे मोर्चा वळवला. तिथे 48 लोकांना ठार केल्यानंतर घरांना पेटवून दिले.