आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्ब स्फोटामध्ये उडाली ग्लॅमरस खासदार, पार्किंगमध्ये गाडीचा झाला होता स्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- सैबेरियातील नोवोसिबिसर्कमध्ये गुरुवारी पार्किंगमध्ये उभ्या गाडीचा स्फोट झाला होता. त्यात रशियातील सर्वात ग्लॅमरस महिला खासदार आेक्साना आणि त्यांचे पती निकिता बोब्रोवास्क्या यांचा मृत्यू झाला होता. ३० वर्षीय आेक्साना सत्ताधारी पक्ष युनायटेड रशियाच्या खासदार होत्या.

वास्तविक आेक्साना कारच्या मागील आसनावर पतीसोबत बसल्या होत्या. त्यांचे पती विशेष लष्करी सेवेत नोकरीला होते. दोघांची चार वर्षांची मुलगीदेखील आहे. आता या हायप्रोफाइल प्रकरणात अनेक प्रकारचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. पहिला तर्क - पतीला खासदार पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून पत्नीसह स्वत:लादेखील उडवून दिले. ही घटना घडण्याच्या अगोदर पतीने त्यांच्यासोबत रोमान्सही केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामागे घटनास्थळी दोघांचेही मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आले आहेत. स्फोटात दोघांचेही चेहरे उडून गेले आहेत. तपास अधिकाऱ्यांना निकिताच्या हाती ग्रेनेड सापडले आहे. निकिता यांनी जाणूनबुजून कारच्या मागील भागात बाॅम्ब पेरला होता. कारण दोघांचेही मृतदेह मिळाले आहेत, असे अन्य एकाथिअरीत सांगण्यात येते.
दुसरी थेअरी वेगळीच आहे. निकिताला पत्नीचे इतरांशी संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून दोघांत नेहमी भांडणे होत. मीडियातदेखील अशा बातम्या वारंवार येत असत. त्यातच निकिता नोकरी सोडून आपल्या पत्नीच्या कमाईवर जगत होता. तो नेहमी घराबाहेरच राहत असे. आेक्साना खासदार होतीच. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन फर्म कंपनी डिस्की प्लसमध्ये उपव्यवस्थापकही होती. पोलिसांनी याथिअरीला पुष्टी दिलेली नाही. अद्याप पोलिसांनी काहीही निष्कर्ष काढण्याची घाई केलेली नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा मर्डर थिअरी : कलह की अफेअर ?