आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालिया : राष्ट्रपती भवनाजवळ बॉम्ब स्फोटात 5 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोगादिशू- अलशबाबच्या अतिरेक्यांनी मंगळवारी सोमालियाच्या राष्ट्रपती भवनाजवळील हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडविले. यात पाच सैनिंक मृत्यूमुखी पडले. अतिरेकी संघटन अल शबाबने या हल्ल्याची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे. त्यांनी सांगितले की कडक सुरक्षा असलेल्या राष्ट्रपती भवनाजवळ हे सैनिक असल्यानेच मुद्दाम त्यांना निशाणा बनविण्यात आले होते.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एसवायएल हॉटेलजवळील हा हल्ला कारबॉम्बच्या मदतीने घडविण्यात आला. या जबरदस्त बॉम्बहल्ल्यात दोन हॉटेल उध्दस्त झाले. मात्र सोमालियाच्या राष्ट्रपती भवनाचे कुठलेही नुकसान झाले नाही. काही लोकांनी हल्ल्याच्यावेळी गोळीबाराचे आवाजदेखील ऐकले. अतिरेक्यांचे लक्ष्य एसवायएल हॉटेल हेच होते.

जिथे बडे सरकारी अधिकारी बैठका घेतात. अल कायदाशी संबंधित अतिरेकी संघटन अल शबाब सोमालिया सरकार आणि राजधानी मोगादिशुमध्ये तैनात आफ्रिकन युनियनच्या सैनिकांवर यापूर्वीही हल्ले करत आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...