आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb Threat Forces Jet Airways To Make Muscat Airport Emergency Landing

मुंबईहून निघालेल्या विमानात बॉम्बची अफवा, मस्कतमध्ये इमर्जंसी लँडींग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मस्कत - मुंबईहून दुबईला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने या विमानाचे ओमानची राजधानी असलेल्या मस्कतमध्ये इमर्जंसी लँडींग करावे लागले. विमानाचा तपास सुरू असून, अद्याप स्फोटके मात्र मिळालेली नाहीत.

टाइम्स ऑफ ओमानच्या वृत्तानुसार एक फोनद्वारे कॉल सेंटरला फ्लाइट क्रमांक 9W-536 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर एटीसीने फ्लाइट दुबईऐवजी मस्कत इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरवण्याचे आदेश दिले. ओमानमध्ये एअरवेजचे जनरल मॅनेजर रियाज कुट्‌टेरी यांनी सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास विमान मस्कतमध्ये उतरवण्याचा आदेश देण्यात आला. गोंधळाच्या वातावरणातच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी विमानात 54 प्रवासी आणि सात क्रू मेंबर होते.

सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळही पाच ते दहा मिनिटे बंद ठेवण्यात आले होेते. या विमानाने मुंबईतून दुपारी 12.24 वाजता उड्डाण घेतले होते. ते 1.58 वाजता दुबईला पोहोचणार होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीत टर्किश एअरलाइन्सच्या विमानातही बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या विमानाचेही इमर्जंसी लँडींग करण्यात आले होते. मात्र तपासात ही अफवा असल्याचे समोर आले.