आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियाच्या इतिहासासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; 276 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमालियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. - Divya Marathi
सोमालियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.
मोगादिशू - सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 276 जण ठार झाले आहेत. सोमालियाच्या इतिहासातील सर्वात मोठा असलेल्या या दहशतवादी हल्ल्यात शेकडो जण जखमी आहेत. अलकायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अल-शबाबने हा हल्ला केला आहे.
 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाट लोकसंख्या असलेल्या भागातील हॉटेलच्या बाहेर ट्रक बॉम्बने स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे हॉटेलची इमारत पूर्णपणे कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले. हॉटेलचे धातूचे प्रवेशद्वार आणि सुरक्षा भिंतही ढासळली. हॉटेलच्या जवळच परराष्ट्र मंत्रालय आणि इतर काही मंत्रालयांची कार्यालये आहेत. सोमालियाने राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
 

सरकारने या स्फोटासाठी अल कायदाची अफ्रिकेतील शाखा अल शबाब या दहशतवादी गटाला जबाबदार ठरवले आहे.  राजधानीत सगळीकडे रुग्णवाहिन्यांच्या सायरनचे आवाज ऐकू येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...