आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Book Claims David Cameron Did Unmentionable Things To A Dead Pig

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मृत डुकराबरोबर केले अनैसर्गिक कृत्य, पुस्तकात दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - कॉलेजच्या काळामध्ये आपण अनेक गोष्टी करतो आणि काळाबरोबर त्या मागे पडतात. हळू हळू अशा गोष्टी आपण पूर्णपणे विसरतो. पण ब्रिटनचे पंतप्रधान त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमधील काही गोष्टींसाठी सध्या चर्चेत आहेत. एका नव्या पुस्तकात त्यांच्याबाबत काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. कॅमरून यांनी विद्यार्थी दशेत असताना एका पार्टीनंतर एका मृत डुकराबरोबर अनैर्गिक कृत्य केल्याचा दावा पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.

एक धनाढ्य उद्योगपती आणि कॅमेरून यांचेच जुने सहकारी मायकल अॅशक्रॉफ्ट यांनी लिहिलेल्या "Call Me Dave" या पुस्तकामध्ये कॅमरून यांच्याबाबत हे दावे करण्यात आले आहे. हे पुस्तक कॅमरून यांचे चरित्र आहे. ते विद्यार्थी दशेत असताना ड्रग घेत असल्याचा दावाही या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. मात्र कॅमरून यांनी सर्व दावे फेटाळले आहेत. अॅशक्रॉफ्ट आणि कॅमरून यांच्यात काही मुद्यांवरून वाद आहे.

अॅशक्रॉफ्ट यांनी कॅमरून यांच्या कॉलेजमधील एका मित्राच्या हवाल्याने या प्रकारचे खळबळजनक दावे केले आहेत. हे पुस्तक राजकीय वैरभावनेतून लिहिलण्यात आले असल्याचा दावा कॅमरून आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. अॅशक्रॉफ्ट यांनी पत्रकार इसाबेल ओकशॉट यांच्या मदतीने हे पुस्तक लिहिले आहे. 2010 कंझर्वेटिव्ह पक्षाची सत्ता आल्यानंतर आपल्याला दिलेल्या वचनाप्रमाणे पद देण्यात आले नव्हते त्यावरून कॅमरून यांच्याबरोबर वाद झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अॅशक्रॉफ्ट हे हाऊस ऑफ लॉर्ड्सचे कंझरर्वेटिव्ह पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या कर चोरीच्या मुद्यावरून पक्षाची मोठ्या प्रमाणावर नाचक्की झाली होती. या बाबतच कॅमेरून यांना सर्वकाही माहिती होते असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. तर कॅमरून यांनी मात्र अशी काहीही माहिती आपल्याला नव्हती असे म्हटले आहे.