आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या बलिदानाची जाणीव देण्यासाठी महिला नौदल अधिकाऱ्याने लिहिले पुस्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - नौदलातील लोकांच्या शौर्याचे किस्से बऱ्याचदा एेकण्यात येतात. मात्र समुद्र क्षेत्रात त्यांचे जीवन कसे असते याची माहिती फार कमी लोकांना आहे. त्यांना कोणत्या समस्यांचा मुकाबला करावा लागतो. मुलांना अशाच गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी सिंगापूरच्या ३० वर्षीय नौदल अधिकारी विनी टेन यांनी पुढाकार घेतला.

 सिंगापूर नौदलाने यावर्षी आपली ५० वर्षे पूर्ण केली. याच निमित्ताने सिंगापूरच्या मुलांसाठी खास चार पुस्तकांची श्रेणी सादर करण्यात आली आहे. ‘अहोय नेव्ही ’ असे याचे शीर्षक आहे. या पुस्तकात पाण्यामध्ये नौदल अधिकाऱ्यांचे जीवन, मोठे व्हेल पाहणे, रात्रीच्या वेळी आकाशाकडे लक्ष देणे अशा विविध गोष्टींची वर्णने आहेत. मुलांना नौदलाविषयी अभिमान वाटावा आणि ज्यांचे पालक नौदलात आहेत त्या पाल्यांना आपल्या आई-वडिलांच्या कर्तृत्वाची जाणीव याद्वारे करून दिली आहे. सध्या २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘पापा गोज टू सी’ आणि ‘इंडी, इंडी, इंडी’ असे त्यांचे शीर्षक आहे. २७ मे ते ३ जून दरम्यान ग्रंथालयांमध्ये ही पुस्तके मुलांसाठी उपलब्ध असतील. ही वाचण्यासाठी नौदलाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. या पुस्तकात अनेक गोपनीय माहितीचाही उल्लेख आहे.

 
या पुस्तकांचा संच नंतर नौदल अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांना पालकांच्या कामाचे स्वरूप कळू शकेल. मेजर लिम वून यांना तीन अपत्ये आहेत. ते म्हणतात, घरी परतल्यावर मुले अनेक प्रश्न विचारतात. मात्र मी फारसे सांगत नाही. वून २० वर्षांपासून नौदलात आहेत. वर्षातून ९ ते १० महिने तैनात असतात. त्यांचीही गोष्ट पुस्तकात लिहिली आहे.  
 
विनी यांनी सांगितले की, पहिली दोन पुस्तके ४ ते ८ वर्षांच्या मुलांना ध्यानात घेऊन लिहिली आहेत. विनी १२ वर्षांपासून नौदलात आहे. सध्या त्या सिंगापूर आर्म्ड फोर्सेसच्या संयुक्त मोहीम विभागात कार्यरत आहेत. त्या सांगतात की , अनेक वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, सुट्या आपण एकट्याने घालवल्या. ही मोठी बाब आहे. नौदलाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना  याची जाणीव असली पाहिजे की कामाचे स्वरूप कसे असते. विनीच्या मते, यापूर्वी एका लेखकाकडून लिहून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र त्या लेखनात जिवंतपणा नव्हता. त्यामुळे मी स्वत: लिहिले. तरुण होणाऱ्या मुलांना ही पुस्तके जाणीव देतील. त्यांच्या पालकांच्या त्यागाची आणि अनेकांच्या हौतात्म्याच्या कथांचाच हा संग्रह आहे.
 
बातम्या आणखी आहेत...