आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8000 मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या 'बोस्नियाच्या कसाया'ला जन्मठेप, हेग कोर्टाचा निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्नियाचा युद्ध गुन्हेगार म्लादिक... - Divya Marathi
बोस्नियाचा युद्ध गुन्हेगार म्लादिक...

हेग - बोस्निया युद्धात हजारो निष्पापांचा बळी घेणाऱ्या रातको म्लादिकला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युद्ध गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवले. तसेच त्याच्या कृत्याबद्दल कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यूएनच्या ट्रिब्युनलने त्याला 11 गंभीर प्रकरणांचा दोषी ठरवले आहे. त्यामध्ये एकाच गावात 8000 मुस्लिमांना उभे करून गोळ्या घालणाऱ्या कृत्याचा प्रामुख्याने समावेश आहे. 1990 च्या दशकात झालेल्या युद्धामध्ये म्लादिक लष्कराचा कमांडर होता. त्यावेळी बोस्नियात त्याला विविध पुरस्कार देण्यात आले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्याला मानवताविरोधी हिंसाचाराचा दोषी मानले आहे. या सुनावणीला हजारो पीडितांचे नातेवाइक उपस्थित होते. निकाल सुनावताच त्यांचे डोळे पाणावले...

 

> म्लादिक विरोधात अमानवीय गुन्हेगारी आणि नरसंहाराचे आरोप आहेत. गेल्या 5 वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी हेग न्यायालयात सुरू होती.
> लष्करात असताना त्याने बोस्नियाचे रेब्रिनिका शहर काबिज केले. अख्ख्या शहरावर घेराव टाकून त्याने 8000 निष्पाप मुस्लिम पुरुष आणि मुलांचा नरसंहार करण्याचे आदेश दिले होते. 
> अमानुषपणाचा कळस गाठणाऱ्या या नराधमाने राजधानी साराजेव्हो येथे नागरिकांना एकत्रित करून त्यांच्या तोफा धडाडल्या होत्या. 
> 2011 मध्ये म्लादिकला अटक झाली. 1992 ते 1995 च्या काळात झालेल्या या युद्धात त्यावेळी सरकारने म्लादिकला विविध शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या युद्धात एकूण 1 लाख नागरिकांचा मृत्यू झाला होता.

 

बातम्या आणखी आहेत...