आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

20 वर्षांची शिक्षा सुनावताच तो ओरडला \'मी युद्धगुन्हेगार नाही\', अन् भर कोर्टात सेवन केले विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बोस्निया युद्धात मुस्लिमांच्या नरसंहार प्रकरणी शिक्षा सुनावताच सोबोदन प्रजलकने भर कोर्टात विष प्राशन केले आहे. त्याला कोर्टाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर तो लगेच उभा होऊन 'मी युद्ध गुन्हेगार नाही' असे ओरडला यानंतर आपल्या खिशातील एक बॉटल काढून पूर्णच्या पूर्ण तोंडात ओतले. 90 च्या दशकात झालेल्या बोस्निया युद्धात हजारो मुस्लिमांना शोधून एकत्रित आणण्यात आले होते. यानंतर त्या सर्वांना गोळीबार आणि तोफ हल्ले करून ठार मारण्यात आले होते. त्या सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या 6 बोस्नियन लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली. 72 वर्षीय प्रजलक त्यापैकीच एक होता.

 

नेदरलॅन्डच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) ही सुनावणी सुरू होती. त्याचवेळी न्यायाधीशांनी प्रजलकला 20 वर्षांची कैद सुनावली. याचवेळी संयुक्त राष्ट्रच्या या कोर्टात विष प्राशन करण्याची घटना घडली. हा प्रकार पाहून न्यायाधीशांसह कोर्टात उपस्थित सगळेच अस्वस्थ झाले. वेळीच आरोग्य विभागाला बोलावण्यात आले आणि बोस्नियाचा गुन्हेगार प्रजलकला स्ट्रेचरवर लादून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. युरोपच्या ICTY चा दाखला देत डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, तो सध्या धोक्यातून बाहेर आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...