आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानाच्या दोन्ही इंजिनांची वीज गुल; 194 प्रवाशांचे प्राण बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - येथून शांघायला जाणाऱ्या सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाच्या दोन्ही इंजिनांची वीज गायब झाली. मात्र, सुदैवाने ३९००० फूट उंचीवर असलेल्या विमानातील चालकदलासह १९४ प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर विमान १३ हजार फूट खाली उतरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
गेल्या शनिवारी फ्लाइट एसक्यू ८३६ बाबत ही घटना घडली. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार पहिले इंजिन निकामी झाल्यानंतर विमान वेगाने खाली कोसळू लागले. यानंतर दुसरे इंजिनही नादुरुस्त झाले. वैमानिकाने २६ हजार फूट उंचीवर विमानावर नियंत्रण मिळवले. विमान सुरक्षित उतरल्यानंतर त्यात कोणताही दोष आढळला नसल्याचे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.
विमान नवीनच...
एअरबसने या विमानाची निर्मिती केले आहे. त्यात रॉल्स रॉयस कंपनीचे इंजिन बसवण्यात आले आहे. विमानाची स्थिती पाहता ते एकदम नवीन आहे. प्लेनस्पॉटर्स डॉट नेटवरील फ्लाइट डेटाबेसनुसार हे विमान मार्च २०१५ मध्ये एअरलाइन्सला मिळाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...