आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pregnancy दरम्यान आई घ्यायची ड्रग्स, जन्मतःच बाळालाही होते व्यसन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लोरिसा जोन्स मुलगा ब्रॅक्सटनसह. - Divya Marathi
क्लोरिसा जोन्स मुलगा ब्रॅक्सटनसह.
बाल्टिमोर - एखाद्या महिलेच्या ड्रग अॅडिक्शनचा तिच्या बाळावरही परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ब्रॅक्सटन नावाच्या बाळाची अवस्था पाहून हे लक्षात येऊ शकते. मेरीलँडच्या बाल्टीमोरमधील क्लोरिसा जोन्स हिने प्रेग्नंसी दरम्यान हेरॉइनचे व्यसन सोडण्यासाठी मेथाडॉन ड्रगचे डोस घेतले. त्याचा परिणाम एवढा वाईट झाला की तिचा नवजात मुलगा ब्रॅक्सटन यालाही जन्मजात व्यसन होते. त्यामुळे ब्रॅक्सटनचे दोन्ही पाय थरकाप होत असल्याने त्याच्या नियंत्रणाबाहेर जातात. अनेकदा तर त्याला श्वास घेतानाही दम लागतो.

हेरोइनचे व्यसन पडले महागात
क्लोरिसा जोन्स हिला हेरोइनचे व्यसन खूप वाईटरित्या जडलेले होते. त्यामुले तिची दोन्ही मुलेदेखिल या ड्रग्जच्या व्यसनासहच जन्माला आली. तिचा मोठा मुलगा जॅकोबीला जन्मापासून हेरोइनचे व्यसन होते. जॅकोबीच्या जन्मानंतरही हेरॉइन घेणे सोडले नव्हते असे क्लोरिसा सांगते. एकदा तर रात्री ती बाळाला घेऊन ड्रग्ज आणण्यासाठी जात होते, त्यावेळी तिचा अपघातही झाला होता. त्यावेळी जॅकोबीचे वय केवळ 22 दिवस होते. त्यानंतर काही दिवसांतच जॅकोबीची कस्टडी तिच्याकडून काढून घेण्यात आली.

ड्रग्स सोडण्याचा निर्णय
त्यानंतर क्लोरिसा दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. त्यामुळे तिने या व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिने हॉपकिन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये व्यसन सोडण्यासाठी एक प्रोग्राम जॉइन केला. याठिकाणी ती डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली राहिली. यादरम्यान तिला हेरोइनचे व्यसन सोडवण्यासाठी डॉक्टर मेथाडॉन दे त होते. मेथाडॉनमुळे ब्रॅक्सटनही ड्रग्सच्या व्यसनासहच जन्माला आला. आता डॉक्टर ब्रॅक्सटनचादेखिल उपचार करत आहेत. त्याच्या प्रकृतीत आता बऱ्याच सुधारणा आहेत. तर क्लोरिसाही आता पूर्णपणे फिट आहे. तिला तिच्या मोठ्या मुलाची कस्टडीदेखिल परत मिळाली आहे.

आईकडून मुलांमध्ये येते व्यसन
अमेरिकेत दर 19 मिनिटांत एक बाळ ड्रग्जच्या व्यसनासह जन्माला येते. गेल्या दशकामध्ये अमेरिकेत एक लाख 300 हजाराहून अधिक मुले ड्रग्जच्यचा व्यसनासह जन्माला आली होती. 2013 मध्ये अशी 27 हजार प्रकरणे समोर आली. तर 2010 पासून आतापर्यंत यामुळे 110 मुलांना प्राण गमवावे लागले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, क्लोरिसा आणि तिचा मुलगा ब्रॅक्सटनचे PHOTOS