आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉयफ्रेंडला सेल्फी पाठवणे तिला पडले महागात, बॉसच्या \'सूटकेस\'मुळे फुटले बिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्वॉयफ्रेंडला पाठवलेल्या सेल्फीत गर्लफ्रेंडच्या बॉसची सूटकेस दिसत आहे. - Divya Marathi
ब्वॉयफ्रेंडला पाठवलेल्या सेल्फीत गर्लफ्रेंडच्या बॉसची सूटकेस दिसत आहे.
इंटरनॅशनल डेस्क- म्हणतात ना कधी कधी खूप चलाखीही अंगलट येते. अशीच एक घठना अटलांटात समोर आली आहे. आपल्या ब्वॉयफ्रेंडला धोखा देत असलेल्या एका तरूणीचे बिंग तिने पाठवलेल्या सेल्फीमुळे फुटले. खरं तर, संबंधित तरूणीने आपल्या ब्वॉयफ्रेंडला आपण एकटेच अटलांटा येथे जात असल्याचे सांगितले. त्याला इम्प्रेस करण्यासाठी तिने अटलांटा येथे गेल्यावर हॉटेलच्या रूममधून एक सेल्फीही पाठवला. मात्र, त्यात तिची चूक झाली म्हणजे ती बाब तिच्या लक्षातच आली नाही. आपल्या ब्वॉयफ्रेंडला जो सेल्फी पाठवला गेला त्यात तिच्या बॉसची सुटकेस दिसून आली. ब्वॉयफ्रेंडला हा घोटाळा समजायला फार वेळ लागला नाही. त्याने लागलीच हॉटेलमध्ये फोन करून माहिती मिळवली. त्यात ती तिच्या बॉसबरोबर हॉटेलमध्ये रूममध्ये असल्याचे समजले. काय आहे नेमके प्रकरण...
- जॅकी नावाची ही तरूणी एका बिजनेस ट्रिपवर अटलांटा येथे गेली होती.
- जॅकीने ब्वॉयफ्रेंडला सांगितले की, ती एकटीच अटलांटा येथे जात आहे.
- हॉटेलमध्ये पोहचताच जॅकीने ब्वॉयफ्रेंडला आपल्या सेल्फी पाठवणे सुरु केले.
- मात्र, एका टॉपलेस सेल्फीत एक अशी बॅग दिसली जी जॅकी घेऊन गेली नव्हती.
- फोटो पाहताच ब्वॉयफ्रेंडला संशय आला. त्याने तिला पुन्हा विचारले, काय तू एकटीच गेली आहे?.
- जॅकीने परत तसेच उत्तर दिले की, ती एकटीच अटलांटा येथे आली आहे व रूममध्ये एकटीच आहे.
- ब्वॉयफ्रेंडला संशय आला होता. त्यामुळे त्याने ती राहत असलेल्या हॉटेलमधील तिच्या रूमचा नंबर मागितला.
- फोन नंबर घेताच ब्वॉयफ्रेंडने हॉटेलमध्ये कॉल केला तेव्हा त्याला कळाले की, ही रूम जॅकी नाही तर तिचा बॉस टॉमच्या नावावर बुक आहे.
- जॅकी खोटं बोलत आहे हे त्याच्या लक्षात आलं तिचे बिंग फुटलं. यानंतर ब्वॉयफ्रेंडने त्याच वेळी तिला टाटा बाय बाय केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, त्यांच्यातील चॅट संभाषण व इतर फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...