आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादी हल्ल्यात फुफ्फुसातून आरपार झाल्या होत्या सहा गोळ्या, सहा महिन्यात झाली एकदम फिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - कराटे खेळतांना दिसणाऱ्या या गोड मुलीचे नाव आहे लिली हॅरिसन. अवघ्या आठ वर्षांची असतांना 23 मे रोजी मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्लयात तिच्या फुफ्फुसातून तब्बल सहा गोळ्या आरपार झाल्या होत्या. या हल्ल्यात 22 जण मृत्यूमुखी पडले होते. इच्छाशक्तीच्या जोरावर या मुलीने आपला फिटनेस पुन्हा मिळविला. 

 

फुफ्फुसातून आरपार झाल्या होत्या सहा गोळ्या 

- एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या या हल्ल्यात सहा गोळ्या लिलीच्या फुफ्फुसातून आरपार गेल्या होत्या. त्यानंतर ती तब्बल आठ आठवड्यांपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र सहा महिन्यांनतर ती पुन्हा मार्शल आर्टकडे वळली.

 

लिलीने विचारले, असे का झाले? आईने सांगितले - काही लोक चांगले नसतात

दहशतवादी हल्ल्यात लिलीची आई लॉरेन गंभीररित्या जखमी झाला होता. आता लॉरेनची तब्येत चांगली आहे. तिने सांगितले की, असे का झाले? हा लिलीचा पहिला प्रश्न होता. त्यावर मी फक्त उत्तरले, की काही लोक चांगले नसतात.

 

पुढील स्लाईडवर पाहा - लिलीचे मार्शल आर्ट खेळतांनाचे फोटो

बातम्या आणखी आहेत...