आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशाचे भयावह चित्र, खून व बलात्काराच्या घटना घडतात नेहमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मुलांचा वापर अंमलीपदार्थांचे पॅकेजिंग करणे, पोलिसांवर नजर ठेवणे, अंमलीपदार्थांचा पुरवठा करण्‍यासाठी केला जातो. - Divya Marathi
या मुलांचा वापर अंमलीपदार्थांचे पॅकेजिंग करणे, पोलिसांवर नजर ठेवणे, अंमलीपदार्थांचा पुरवठा करण्‍यासाठी केला जातो.
ब्राझील जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मात्र हा देश गुन्ह्यांच्या बाबतीतही सर्वात पुढे आहे. प्रत्येक दिवशी येथे डझनभर खून, अंमलीपदार्थांची तस्करी आणि चो-या यासारख्‍या घटना घडत असतात. इतकेच नव्हेतर या गुन्ह्यांमध्‍ये कमी वयाच्या मुलांचाही सहभाग असतो. हजारो लोकांना प्रत्येक वर्षी मारले जाते...
- मेक्सिकोच्या पब्लिक सिक्युरिटी अँड क्रिकेट जस्टिस सेंटरने या वर्षी गुन्ह्यांसंदर्भात अहवाल प्रसिध्‍द केला आहे.
- अहवालात या देशाला मर्डर कॅपिटल असा उल्लेख करण्‍यात आला.
- अहवालानुसार, ब्राझीलच्या 22 शहरांमध्‍ये भयानक गुन्हे घडत असतात. हे प्रमाण इतर देशांतील शहरांच्या तुलनेत खूप आहे.
- संयुक्त राष्‍ट्रसंघाच्या (यूएन)अहवालानुसार, 1978 ते 2003 या दरम्यान 5 लाख लोकांचा खून करण्‍यात आला होता.
खून, बलात्कार आणि घरगुती हिंसा
- ब्राझीलमध्‍ये विशेषत: कृष्‍णवर्णीय, ट्रान्सजेंडर आणि गरीब लोकांची हत्या केली जाते.
- येथे प्रत्येक एक लाखात 35 लोकांना मारले जाते.
- एक लाखमध्‍ये 4.8 महिलांचा खून केलेला असतो.
- 2003 ते 2013 पर्यत कृष्‍णवर्णीय महिलांच्या हत्येच्या आकड्यात 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गँगमध्‍ये यामुळे सामील होतात मुले
- लूट व अपहरण या गोष्‍टी येथे सामान्य आहे. नेहमी स्थानिक लोक व पर्यटकांना पैशांसाठी अपहरण केले जाते.
- येथे अनेक गँग आहेत. यामुळे ब्राझील बदनाम आहे.
- हे गँग जाणूनबुजून मुलांना सामील करुन घेतात. कारण या मुलांना जास्त काळ तुरुंगात ठेवता येत नाही.
- 2007 मध्‍ये मारण्‍यात आलेल्या लोकांमध्‍ये 40 टक्के 15-25 वयोगटातील लोक होते.
अंमलीपदार्थांच्या व्यापारासाठी मुलांचा वापर
- ब्राझीलमध्‍ये अंमलीपदार्थ व शस्त्रांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो.
- हे काम करण्‍यात मुले पारंगत असतात.
- या मुलांचा वापर अंमलीपदार्थांचे पॅकेजिंग करणे, पोलिसांवर नजर ठेवणे, अंमलीपदार्थांचा पुरवठा करण्‍यासाठी केला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा गुन्ह्याचे आणखी फोटोज...