आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्ष लहान प्रियकराच्या मदतीने राजदूत पतीचा काढला काटा, पकडल्यावर चेहरा असा लपवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कस्टडीत असलेली ग्रीस अॅम्बेसेडरची पत्नी फ्रान्स्वा तोंड लपवताना... - Divya Marathi
पोलिस कस्टडीत असलेली ग्रीस अॅम्बेसेडरची पत्नी फ्रान्स्वा तोंड लपवताना...
रिओ डे जेनेरियो- ग्रीसचे अॅम्बेसडर किरियाकोस अमीरीदिस यांची हत्या त्यांच्याच पत्नीने केल्याचे समोर आले आहे. हा दावा ब्राझीलच्या पोलिसांनी केला आहे. पत्नी फ्रान्स्वाने आपल्या प्रियकराला सोबत घेत पतीचा काटा काढला. पोलिसांनी सध्या या दोघांनाही अटक केली आहे. फ्रान्स्वाला जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये आणले जात होते तेव्हा तो सर्वापासून आपला चेहरा लपवत होती. किरियाकोस काही दिवसापासून होते बेपत्ता.....
 
- मागील सोमवारी बेपत्ता झालेले ग्रीसचे अॅम्बेसेडर किरियोकोस यांचा मृतदेह गुरुवारी रिओ डे जेनेरियोच्या बाहेर एका जळालेल्या कारमध्ये मिळाला होता. 
- पोलिसांनी दावा केला आहे की, किरियाकोसचा मर्डर त्यांची पत्नीने तिच्या प्रियकराला सोबत घेत केला आहे. 
- किरियाकोसची पत्नी फ्रान्स्वा अमीरीदिस (40) ब्राझीलचीच आहे आणि तिला अटक केली आहे. 
- तिचा 29 वर्षाचा बॉयफ्रेंड सर्जियो मोरेइरा पेशाने एक पोलिस अधिकारी आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे.
- सर्जियोसोबतच त्याचा कजन एदुआर्दो दे मेलो सुद्धा या हत्येच्या षडयंत्रात सामील होता.
- पोलिसच्या माहितीनुसार, दे मेलोला सुद्धा अटक केली आहे आणि त्याने आपले सर्व गुन्हे माफ केले आहेत. 
- दे मेलोने सांगितले की, या बदल्यात त्याला राजदूतची पत्नीने हत्येनंतर 16.70 लाख देणार होती.
 
ख्रिसमस साजरा करायला आले होते सासुरवाडीला- 
 
- ग्रीसचे अॅम्बेसेडर किरियोकोस अमीरीदिस (59) यांनी 15 वर्षापूर्वी ब्राझीलची फ्रान्स्वा हिच्यासोबत लग्न केले होते. दोघांना एक दहा वर्षाची मुलगीही आहे. 
- किरियाकोस ख्रिसमस साजरा करण्यासाठी रिओ डे जेनेरियोतील पत्नीच्या घरी गेले होते.
- बुधवारी पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तिने सांगितले की, त्यांनी एक भाड्याने कार घेतली होती व तेव्हापासून ते घरी परतले नाहीत.
- गुरुवारी किरियाकोस यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत एका रस्त्यावर कारमध्ये आढळला. मृतदेह जळून खाक झाला होता. मात्र पोलिसांनी दावा केला आहे की, हा मृतदेह किरियाकोस यांचाच आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...