ब्राझीलमध्ये जगातील पहिले अॅडल्ट थीम पार्क इरॉटिकालँड खुले होणार आहे. 2018 पर्यंत सुरु होणा-या या पार्क पिरासिसाबामध्ये बनवले जाणार आहे. हे साओ पेड्रो शहरापासून दोन तासांच्या अंतरावर आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, हे बनवण्यासाठी 539 कोटी रुपये खर्च येणार आहे. इतर कोणत्याही अॅम्यूजमेंट पार्क प्रमाणे येथेही वॉटर स्लाइड, भूलभुल्लैया, फेरी व्हील आणि राइड्स असेल. या व्यतिरिक्त येथे इरॉटिक म्युझियम व प्रायव्हेट बूथ्सही बनवले जाणार आहे; येथे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही व त्याचे शुल्क जवळजवळ 6 हजार 700 रुपये असेल. मात्र लोकांना भीती आहे, की पार्कमुळे हे शहर ' द कॅपिटल ऑफ सेक्स' होईल. दुसरीकडे, गुंतवणुकदारांच्या म्हणण्यानुसार, थीम पार्कमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल व कमीत कमी 250 लोकांना नोकरी मिळेल. पुढील स्लाइड्सवर पाहा कसे असे हे थीम पार्क...