आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये या स्वीपरने उडवली खळबळ, मॉडेलिंगसाठी मिळाली ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम करताना रिटाचा सेल्फी. दुसऱ्या फोटोत तिचे काम करत असताना. - Divya Marathi
काम करताना रिटाचा सेल्फी. दुसऱ्या फोटोत तिचे काम करत असताना.
रियो डी जेनेरियो - ब्राझीलच्या या शहरात 23 वर्षीय रिटा मॅटोज रोज सकाळी 4.20 मिनिटांनी उठते. त्यानंतर पुढचे 12 तास ती शहरातील घाण स्वच्छ करण्याच्या कामात व्यस्त असते. रिटा पेशाने स्ट्रीट स्वीपर आहे. काही दिवसांपूर्वी तिचे ऑरेंज यूनिफॉर्ममधील आकर्षक फोटो संपूर्ण ब्राझीलमध्ये व्हॉट्स अपद्वारे व्हायरल झाले. इंटरनेटवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्याने तिला मॉडेलिंग, मैत्री आणि विवाहासाठी ऑफर येऊ लागल्या आहेत. ती 'स्वीपर बेब' नावाने प्रसिद्ध झाली आहे. फेसबूकवर तिचे बिकिनी आणि शॉर्ट्स घातलेले फोटो शेअर केले जात आहेत.

लोकांना वाटते आश्चर्य
महिन्याकाठी 400 पाउंड म्हणजेच 40 हजार रुपये कमावणारी रिटा पहाटेच उठते आणि सलग 12 तास काम करते. गेल्या वर्षी मार्चपासूनच ती साऊथ अमेरिकेच्या रियलेंगो डिस्ट्रिक्टमध्ये रस्ते स्वच्छ करण्याबरोबरच ड्रेनेजचे ब्लॉकेज दूर करण्याचे काम करते. ब्राझीलच्या एक्स्ट्रा या वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले की, तिला रस्त्यावर हातात झाडूसह पाहून लोकांना आश्चर्य वाटते. तिला यापेक्षा चांगली नोकरी मिळू शकते आणि ती विवाहदेखिल करू शकते, असे तिला सुचवतात. पम तिला तिच्या कामावर गर्व आहे.

लोकांची टीका
एक महिला स्वच्छता कर्मचारी एवढी प्रसिद्ध होत असल्याने लोकांना चांगले वाटत नसल्याचे रिटा सांगते. जे लोक फार सुंदर दिसत नाहीत, त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा रिटा प्रयत्न करत असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. पण आता तिला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. लवकरच तिला मॉडेलिंगचे चांगले काम मिळेल अशीही तिला आशा आहे. विशेष म्हणजे न्यूड पोज द्यायलाही आपण तयार असल्याचे रिटा सांगते. या कामाने माझी बॉडी शेपमध्ये राहते. त्यानंतर मी जिममध्येही चांगलाच घाम गाळते. मी डायटींग करत नाही. मला हवं ते मी भरपूर खाते असे ती सांगते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रिटाचे व्हायरल झालेले काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...