आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळग्रस्त नवजातांच्या मदतीसाठी ब्रेस्टमिल्क दान; 1300 किमी दूर असूनही पीडितांना मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन- आठवडाभराआधी जेव्हा अमेरिकेत हार्वे चक्रीवादळ आणि पूर आला. त्यामुळे ह्युस्टनमध्ये अब्जावधींचे नुकसान तर झालेच, शिवाय हजारो लोक बेघरही झाले. पण याच संकटात अनेकांनी पीडितांना शक्य ती सर्व मदत केली. डॅनियएला पॉमर ही महिला त्यापैकीच एक. तिने पीडित नवजातांना ३० लिटर ब्रेस्ट मिल्क दान केले.
 

ओव्हेन्सव्हिलेत राहणारी पॉमर तीन मुलांची आई आहे. ती म्हणाली, “ जेव्हा चक्रीवादळ आले तेव्हा ते एवढे विध्वंसकारी असेल, असे मला वाटले नव्हते. पण ह्युस्टन पुरात बुडाले आणि हजारो लोक बेघर झाले. मला पूरग्रस्तांची चिंता वाटायला लागली. आई असल्याने मला नवजात मुले आणि त्यांच्या आईची जास्त काळजी होती. मला त्यांना मदत करण्याची इच्छा होती. पण मी ह्युस्टनपासून १३०० किमी दूर होते. तरीही पीडितांना कशी मदत करावी, याची चर्चा मी जवळपासच्या लोकांशी केली.
 
अशाच चर्चेत मुलाच्या शिक्षकाने मला ब्रेस्टमिल्क दान देण्याची सूचना केली. ही कल्पना मला आवडली. त्याची दोन कारणे होती. पहिले म्हणजे माझा तीन महिन्यांचा मुलगा हृदयाशी संबंधित आजारामुळे ब्रेस्टमिल्क कमी पितो. त्याला आयव्हीद्वारे थोडे दूध आणि इतर पोषक आहार दिला जातो. त्यामुळे मला ब्रेस्टमिल्क पंप करावे लागते, ते मी फ्रीज करून ठेवते. दुसरे कारण म्हणजे दूध दान देऊन मी नवजात मुलांना मदत करू शकत होते.” ब्रेस्टफीडिंग ममा टॉकने फेसबुक पेजवर पॉमरच्या दानाचा उल्लेख केला. एका युजरने त्यावर कॉमेंट केली, ‘मुलगा आजारी असूनही जिने स्वत:ला भक्कम ठेवले अशा महिलेचा मला गर्व वाटतो. मुलांना सर्वाधिक गरज असणारी वस्तू तिने दान केली.’ दुसऱ्या युजरने लिहिले,‘पॉमरचे आभार. तिने कितीतरी मुलांना मदत केली.’

जेवढे ब्रेस्टमिल्क दान केले त्यातून नवजात ३४६ वेळा दूध पिऊ शकतात
पॉमर म्हणाली,“ मी १०४० औंस म्हणजे ३०.७५६ लिटर ब्रेस्टमिल्क डोनेट केले. साधारणत: एक मुलगा तीन औंस म्हणजे ९० मिली दूध पितो. म्हणजे मी जे दान केले, त्यातून नवजात मुले ३४६ वेळा दूध पिऊ शकतात. ज्यांना गरज होती अशा मुलांना मी मदत करू शकले हे एेकून खूप समाधान मिळाले.”
बातम्या आणखी आहेत...