आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिक्स परिषद: मोदींनी मानले पुतीन यांचे आभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्लादिमीर पुतीन. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्लादिमीर पुतीन.
उफा (रशिया) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौ-यात पहिल्या टप्प्यामध्ये अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा केल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभारही मानले. 10 जुलै रोजी मोदींची पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट होण्याची शक्यता आहे.

उफामध्ये मोदी ब्रिक्स व शांघाय संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या काळात जागतिक नेत्यांशी विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा होण्याची आशा मोदींनी व्यक्त केली. सहा देशांच्या दौ-यात उझबेकिस्तान व कझाकिस्तानचा दौरा संपवून मोदी रशियात दाखल झाले आहेत.
जोरदार स्वागत : रशियात दाखल होताच मोदींचे खास मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.
ब्रिक्स परिषद : ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द. आफ्रिका या देशांची ‘ब्रिक्स’ संघटना आहे. यासाठी ब्रिक्स विकास बँकेची स्थापना करून बँकेचे पहिले प्रमुख म्हणून के. व्ही. कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या परिषदेमध्ये मोदींशिवाय चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे ब्लादिमिर पुतिन, ब्राझीलचे दिल्मा रुसेफ आणि द. आफ्रिकेचे जेकब जुमा सहभागी होत आहेत.

रशिया दौरा खासच
रशियात येणे म्हणजे माझ्यासाठी विशेष बाब आहे. याचे कारणही तसेच आहे. भारत-रशियाची मैत्री गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वज्ञात आहे. म्हणून या देशाच्या दौ-यावर येण्यात आपलेपणा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पुढे वाचा.. युरेनियम पुरवठ्यासह कझाकिस्तानशी पाच करार