आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमचा अजेंडा इतरांनी ठरवू नये; आम्हाला वाटते तेच बोलू! भारताने चीनला ठणकावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२००९ मध्ये पहिले संमेलन : ब्रिक्सचे पहिले संमेलन रशियात झाले तेव्हा ब्राझील, रशिया, भारत व चीन हे चार सदस्य होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाले तेव्हा हे ब्रिकचे ब्रिक्स झाले. - Divya Marathi
२००९ मध्ये पहिले संमेलन : ब्रिक्सचे पहिले संमेलन रशियात झाले तेव्हा ब्राझील, रशिया, भारत व चीन हे चार सदस्य होते. २०१० मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाले तेव्हा हे ब्रिकचे ब्रिक्स झाले.
शिआमेन-पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स संमेलनात सहभागी होणार आहेत. व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीकडे लक्ष लागले आहे. दोन्ही नेत्यांत चर्चा होईल किंवा नाही, अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे संमेलनाच्या निमित्ताने भारताने पाकिस्तानच्या दहशतवादाचा मुद्दा मांडू नये, असे चीनने म्हटले आहे. परंतु आमचा अजेंडा आम्ही ठरवू, इतरांना तो ठरवू नये. आम्हाला वाटते, तेच बोलू  अशा शब्दांत भारताने यजमान चीनला ठणकावले आहे.चीनच्या दक्षिणेकडील फुजियान प्रांताच्या शिआमेन शहरातील संमेलनात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख नेते सहभागी होतील.  
 

पाच देशांच्या उद्योगपतींची भेट
ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर शियामेन शहरात उद्योजकांची देखील एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशोदेशीचे १२०० उद्योजक त्यात सहभागी होतील. यात भारतातील उद्योजकांचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हस्ते या बैठकीचे उद््घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या उद्योगपतींची देखील या निमित्ताने भेट घेणार असल्याचे सांगणअयात आले. इजिप्त, गिनिआ, मेक्सिको, तझाकिस्तान, थायलंडचे नेतेही आमंत्रित आहेत.
 
 
चीनमधील दाेन दिवसांच्या  मुक्कामानंतर म्यानमारला 
चीनच्या दौऱ्यानंतर ५ -७ सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय पुरातत्व खात्याने आनंद मंदिर भागात केलेले शोधाचे काम मोलाचे आहे. त्या ठिकाणी भेट देण्याची उत्सुकता आहे. उभय देशांत नवीन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. गेल्या वर्षी आँग सान स्यु की यांनी भारताला भेट दिली होती. या दौऱ्यात म्यानमारमधील भारतीय वंशाच्या समुदायाशी संवाद साधण्याचीही माझी इच्छा आहे. या दौऱ्यातून दोन्ही देशांतील संबंध आणखी बळकट होतील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलानंतर ते रविवारी चीनला रवाना होतील. 
 
 
उज्वल भविष्यासाठी बळकट भागीदारी ही संमेलनाची संकल्पना
- उज्वल भविष्यासाठी बळकट भागीदारीची संकल्पना. आर्थिक, राजकीय, सुरक्षेवर चर्चा अपेक्षित.
- थायलँड, मेक्सिको, इजिप्त, तझाकिस्तानही शियामेनमध्ये सहभाग. निरीक्षक राष्ट्र म्हणून आमंत्रण.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...