आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील ‘घातक’ मॅगी ब्रिटनमध्ये खाण्यायोग्य, निर्धारित प्रमाणात शिसे असल्याचा निर्वाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - प्रमाणापेक्षा जास्त शिसे असल्यामुळे भारताने बंदी घातलेली नेस्लेची ‘मेड इन इंडिया’ मॅगी एफएसए या ब्रिटनच्या अन्न सुरक्षा नियामकाने खाण्यायोग्य ठरवली आहे. त्यात निर्धारित प्रमाणाएवढेच शिसे असल्याचाही निर्वाळा दिला आहे.

मॅगीमध्ये निर्धारित प्रमाणाएवढेच शिसे असल्याचे नमुन्यांच्या चाचणीत आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे एफएसएच्या निवेदनात म्हटले आहे. भारतातील चाचणीत मॅगीत प्रमाणाबाहेर शिसे आढळल्याने बाजारपेठेतून मॅगीचे उत्पादन परत घेण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मॅगीच्या नमुन्यांची चाचणी घेण्याचा निर्णय एफएसएने घेतला होता. नेस्लेची मसाला मॅगी भारतातून ब्रिटनमध्ये आयात केली जाते. मॅगीच्या ९०० नमुन्यांत निर्धारित प्रमाणाएवढेच शिसे आढळल्याचे एफएसएने म्हटले आहे. व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरच्याही अन्न सुरक्षा नियामकांनी मॅगी खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे.