आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Elections: Devid Camroon Starts Second Term

ब्रिटनच्या निवडणुकीत डेव्हिड कॅमरून यांना दुस-यांदा संधी, मोठा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी डेव्हिड कॅमरून यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्कॉटलंड आणि वेल्सच्या मुद्द्यावरून कॅमरून यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतरही जनतेने कॉन्झर्व्हेटिव्ह सरकारला कौल दिला. विजयानंतर १० डाउनिंग स्ट्रीटवर जल्लोष करण्यात आला. मतमोजणीत कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३३१ जागी विजय मिळवला.

गुरूवारी रात्रीपासूनच मत मोजणीला सुरुवात झाली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये कॅमरोन यांना दुस-यांदा पंतप्रधान पदाची संधी मिळणार निश्चित झाले आहे. शुक्रवारी मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला ३३१ जागी विजय मिळाला आहे. लेबर पार्टीला २३२ जागी विजय संपादन करता आला. एसएनपी-५६, लिबरल डेमोक्रॅट्स-८, यूकेआयपी-१, इतर-२२ अशी जाहीर झालेल्या निकालानंतरची स्थिती आहे. तत्पूर्वी मतदानोत्तर चाचणीत कॅमरोन यांच्या पक्षाला ३२९ जागी विजय मिळेल, असा दावा करण्यात आला होता. ६५० सदस्यीय हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमतासाठी ३२६ ची संख्या हवी आहे. विजयामुळे आता त्यांची १० डाऊनिंग स्ट्रिटवर दुसरी टर्म सुरू होऊ शकेल. १० डाऊनिंग स्ट्रिट येथे पंतप्रधानांसह लष्करी उच्चाधिका-यांची कार्यालये आणि निवासस्थाने आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या निवडणुकीत स्कॉटलंड, युरोपीय परिषदेचे मुद्दे चांगलेच गाजले होते.त्याचबरोबर ‘अबकी बार कॅमरोन सरकार ’ ही मोदी स्टाइल घोषणाही निवडणूक प्रचाराला भारतीय निवडणुकीसारखा रंग चढवणारी ठरली होती.

लिबरल डेमोक्रॅट्सला फटका
सत्ताधारी टोरीच्या आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या लिबरल डेमोक्रॅट्समध्ये जनतेने ब-याच प्रमाणात नाकारल्याचे दिसून आले आहे. जाहीर निकालात लिबरल पार्टीने ३९ जागा गमावल्या. २०१० च्या निवडणुकीत पक्षाकडे ५७ खासदार होते. स्कॉटलंडमध्ये तीन जागा सोडून एसएनपी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

युनायटेड किंग्डमच्या नागरिकांचे कल्याण हेच ध्येय : कॅमरून
युनायटेड किंग्डममधील नागरिकांच्या कल्याणासाठी नियमानुसार जे काही करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असेल. देशाची एकात्मता हेच आपले सर्वोच्च ध्येय आहे. वेल्स आणि स्कॉटलंडला एकसंध ठेवण्यात येईल. सत्ता स्थापनेत मला यश मिळाल्यास हे देशाची सेवा करणे माझे भाग्य समजेन, असे पंतप्रधान डेव्हिड कॅमरोन यांनी म्हटले आहे. कॅमरोन यांच्या विजय महत्वाचा आहे.

नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांचा विजय
इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक ( ३४)यांचा ब्रिटनच्या निवडणुकीत विजय झाला आहे. रिचमण्ड यॉर्क्स मतदारसंघातून त्यांचा विजय झाला आहे. ऋषी आणि अक्षता यांनी खूप परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांना हा क्षण पाहायला मिळाला. त्यांच्या विजयाचा मला मनापासून आनंद होत आहे. आता ऋषी खासदार झाले आहेत. आपली जबाबदारी ते अतिशय चांगल्या प्रकारे निभावतील, असा विश्वास नारायण मूर्ती यांनी व्यक्त केला. ते ऑक्सफर्ड विद्यापीठाचे पदवीधर आहेत.

५० मिनिटांत निकाल
निवडणुकीचा पहिला निकाल संडरलँडमधून जाहीर झाला. तोही केवळ ५० मिनिटांत स्पष्ट झाला.

भारतीय वंशाचे १० खासदार
>ब्रिटनच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांत विविध पक्षांतील भारतीय वंशाच्या १० जणांचा समावेश आहे.
>२०१० च्या निवडणुकीत भारतीय वंशाचे केवळ ८ उमेदवार निवडून आले होते. यंदा विजयाचा नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
>लेबर पार्टीचे केथ वाझ (लेसिस्टर पूर्व ) ,विरेंद्र शर्मा (एलिंग साऊथहॉल) विजयी झाले.
>कॉन्झर्व्हेटिव्हकडून प्रिती पटेल (विथाम) विजयी झाल्या. त्या कॅमरोन यांच्या निकटवर्तीयांपैकी मानल्या जातात.
>लेबर पार्टीच्या वेलरी वाझ (वाल्साल दक्षिण), सीमा मल्होत्रा (नैऋत्य लंडन) विजयी झाल्या. इतर भारतीय वंशाच्या विजयी उमेदवारांत आलोक शर्मा (रिडिंग वेस्ट), शैलेश वारा (केम्ब्रिशायर वायव्य ), सुएल्ला फर्नांडिस (फेरहॅम), लिसा नंदी.

निराशाजनक निकाल : मिलीबँड
लेबर पार्टीचे नेते मिलिबँड यांनी सार्वत्रिक निवडणूक आपल्यासाठी निराशाजनक आणि कठीण ठरली अशी प्रतिक्रिया दिली आहे.