आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या तुरुंगात २०० कैद्यांचे बंड, अधिकाऱ्यांनी सुरक्षित स्थळी घेतली धाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - येथील बेडफोर्ड तुरुंत २०० कैद्यांनी तुरुंग प्रशासनाविरुद्ध आपला क्षोभ व्यक्त केला. मध्य इंग्लंडमध्ये स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. तुरुंगातील सुविधांविषयी व कर्मचाऱ्यांच्या आक्रमकतेविषयी या कैद्यांची तक्रार होती. कैद्यांची दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. वॉर्डन आणि तुरुंग कर्मचारी, अधिकाऱ्यांविरुद्धचा राग व्यक्त करण्यासाठी २०० कैद्यांनी तोडफोड केल्याचे तुरुंग अधिकारी संघटनेचे महासचिव स्टीव्ह गिलन यांना सांगितले. बीबीसी रेडिआेने दिलेल्या वृत्तात तुरुंगात रक्तपात होत असल्याचे म्हटले आहे. तुरुंग अधिकारी व कर्मचारी या क्षोभाने भांबावल्याचा दावाही बीबीसीने केला.
कैद्यांनी एकत्रित हल्ला केल्याने तुरुंग कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. बेडफोर्ड तुरुंगात सध्या ५०० कैदी आहेत. दरम्यान कैद्यांच्या तक्रारीविषयी तुरुंग अधिकारी व कर्मचारी तोडगा काढत असल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...