आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांमधील लठ्ठपणा, शुगर टॅक्स लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला आळा घालण्यासाठी ब्रिटनमध्ये शुगर टॅक्स सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे देशातील सॉफ्ट ड्रिंक उत्पादक कंपन्यांना कर द्यावा लागणार आहे. करातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग शालेय मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक कार्यक्रमांवर केला जाणार आहे. २ ते १५ वर्षीय मुलांपैकी सुमारे एक तृतीयांश मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसून येते.

ब्रिटनचे अर्थमंत्री जेन एलिसन म्हणाले, मुलांमधील लठ्ठपणा ही देशासमाेरील मोठी समस्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेचे अब्जावधी पौंडचे नुकसान होत आहे. खरे तर वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने दीर्घकाळापासून एक रणनीती तयार केली आहे. त्यानुसार सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांवर कर लावला जाणार आहे. परंतु हे धाेरण कमकुवत असल्याची टीका केली जात आहे. अॅक्शन ऑन शुगर कॅम्पेन ग्रुपचे चेअरमन प्रोफेसर ग्रॅहम मॅकग्रेगॉर यांच्या म्हणण्यानुसार सरकारचे धोरण लठ्ठपणा व मधुमेहाच्या संकटाला धक्का देण्याचा प्रयत्न आहे.

शंभर मिली सॉफ्ट ड्रिंकमध्ये ५ ग्रॅम हून जास्त साखरेचे प्रमाण आढळून आल्यास कर लावण्यात येणार आहे. सॉफ्ट ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण जेवढे अधिक असेल तितक्याच प्रमाणात करदेखील लावण्यात येणार आहे. दुसरीकडे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, कॅम्पेनर्स, खासदार, सुपरमार्केटच्या लोकांनीदेखील ही योजना कमकुवत असल्याचे म्हटले आहे. सॉफ्ट ड्रिंकमधील साखरेचे प्रमाण मुलांसाठी सर्वात मोठा साखरेचा स्रोत आहे. एक कॅन सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानंतर मुले आपोआपच दिवसभरातील गरजेपेक्षा अधिक साखर घेत असतात. सॉफ्ट ड्रिंकच्या एका कॅनमध्ये ९ चमचे साखर असते.

मुलांसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनातील साखरेचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी करण्यात यावे, असे सरकारने बजावले आहे. पहिल्या वर्षी ५ टक्क्यांनी कमी व्हावे. सहा महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी या निर्णयास विरोध केला.

फ्रान्स, हंगेरी, बेल्जियममध्ये अगोदरच टॅक्स
ब्रिटनने शुगर टॅक्स लागू केल्यानंतर ते बेल्जियम, हंगेरी, फ्रान्सच्या गटात सहभागी होणार आहे. तिन्ही देशांत साखरेवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील कर लागू आहे. स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वेमध्ये अनेक वर्षांपासून करवसुली केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...