आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमरून सरकारमध्ये मूळ गुजराती प्रीती पटेल मंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनमध्ये मोठ्या मताधिक्याने सत्तेत परतलेल्या डेव्हिड कॅमरून यांनी सोमवारी नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. अर्थ, विदेश, संरक्षण आणि गृह मंत्रालये आधीच्याच मंत्र्यांकडे ठेवली. लंडनचे महापौर बोरिस जॉन्सन यांना बिनखात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. मूळ गुजराती प्रीती पटेल नव्या रोजगार मंत्री झाल्या आहेत

प्रीती अॅस्थर मॅक्वे यांची जागा घेतील. या निवडणुकीत मॅक्वे यांचा पराभव झाला आहे. बॅरोनेस स्टोवेल यांना लीडर ऑफ हाऊस ऑफ लॉर्ड््स (लोकसभा अध्यक्ष समकक्ष) कॅमेरून यांनी पाकिस्तान वंशाच्या साजिद जाविद यांना बढती देत वाणिज्यमंत्री केले आहे. साजिद यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय होते. साजिद यांचे वडील पाकिस्तानमध्ये बसचालक होते. त्यांनतर ते ब्रिस्टलमध्ये स्थायिक झाले.

जाविद यांचा जन्म ५ डिसेंबर १९६९ रोजी रोशडेलमध्ये (लंकाशायर) झाला होता. लेबर खासदार मायकेल फॉस्टर यांना पराभूत करणाऱ्या अंबर रड यांना ऊर्जा आणि हवामान बदल विभाग देण्यात आला आहे. रड यांनी लेखक ए. ए. गिल यांच्याशी विवाह केला होता. १९९५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. दोघांना दोन मुले आहेत. रड यांनी वाणिज्य पत्रकार म्हणून काम केलेले आहे.