आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या संसदेत अखेर ब्रेक्झिटवर शिक्कामोर्तब, स्वायत्त स्कॉटलंडच्या मागणीसाठी दबाव वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिट विधेयक अखेर संमत झाले. पंतप्रधान थेरेसा मे यांचा आता युरोपियन युनियनशी वाटाघाटी करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. हाऊस ऑफ लॉर्ड््सने सुचवलेल्या सुधारणा मंगळवारी हाऊस ऑफ कॉमन्सने रद्द ठरवल्या. युरोपियन युनियनचे नागरिक म्हणून आता ३ महिने ब्रिटिशांना मान्यता असेल. ३३५ पैकी २८७ लोकप्रतिनिधींनी ब्रेक्झिटला कौल दिला. ब्रेक्झिट विधेयक जसे सादर झाले होते तसेच हाऊस ऑफ कॉमन्सने मान्य केले आहे. त्यात कोणताही बदल केला नाही.  

हाऊस ऑफ लॉर्ड््स या वरिष्ठ प्रतिनिधी गृहातील २७४ पैकी ११८ प्रतिनिधींनी या विधेयकावर आक्षेप घेतला होता. युरोपियन युनियनचे नागरिकत्व आणि दर्जा  कायम राहण्याविषयी काही खासदारांनी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र ती बहुमताने रद्द ठरवण्यात आली. आता हे विधेयक महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे मंजुरीसाठी जाईल. त्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे.   

लिस्बन कराराच्या कलम ५० नुसार चर्चा करण्यासाठी आता थेरेसा मे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या आठवड्यातही त्या चर्चा सुरू करू शकतात. मात्र मार्चअखेरपर्यंत तसे होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.  
 
नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून मतभेद
युरोपियन युनियमनमधील नागरिकत्वाच्या दर्जावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत मतभेद आहेत. विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने वरिष्ठ सभागृहाने सुचवलेल्या सुधारणा गांभीर्याने घेतल्या जाव्यात, असे आग्रही प्रतिपादन केल. ब्रिटनचे आर्थिक हितसंबंध आणि मानवी पातळीवर युरोपियन युनियनच्या नागरिकांच्या विशेषाधिकारांवर विचार करावा, असा आग्रह लेबर पार्टीचा आहे. नेता जेरेमी कॉर्बिन यांनी भूमिका मांडली आहे.

स्कॉटलंडची स्वायत्ततेची मागणी, युरोपियन युनियनमध्ये राहण्याची इच्छा
स्कॉटलंडच्या पंतप्रधान निकोला स्टरजन यांनी स्वायत्त स्कॉटलंडची मागणी लावून धरली. स्कॉटलंड ब्रिटनच्या धोरणांविरुद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ब्रेक्झिटनंतर स्कॉटलंडचे युरोपियन युनियनशी संबंध कायम ठेवण्याची इच्छा निकोलांनी व्यक्त केली. 
 
बातम्या आणखी आहेत...