आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Queen Celebrate Her Birthday As Clean Campaign

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारतात स्वच्छता मोहिमेचा बोलबाला असतानाच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने या वर्षी देशात स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन फॉर दर क्वीन असे मोहिमेचे नाव असून स्वच्छता मोहिमेसाठी देशातील निवडक १२ ठिकाणे शोधून काढण्यात आली आहेत. नागरिकांना जी ठिकाणे स्वच्छ व्हावीत, असे वाटते अशा ठिकाणांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकांची मते मागवण्यात आली होती. मोहिमेसाठी सुमारे १० लाख स्वयंसेवक तयार करण्यात येणार आहेत. ही साफसफाई ४ ते ६ मार्चदरम्यान सुरू होईल. महाराणींचा वाढदिवस २१ एप्रिल रोजी होणार आहे. या मोहिमेला उद्योजक, धर्मादाय संस्था, स्थानिक संस्था, शाळांकडूनही चांगला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अनेक संस्थांनी मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.